Lata Mangeshkar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lata Mangeshkar: 20 भाषांमध्ये 30 हजारांहून जास्त गाणी; कधी नाचवलं, कधी रडवलं

भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना आधी कोरोना आणि नंतर न्युमोनियाची लागण झाली होती. (Lata Mangeshkar More than 30000 songs in 20 languages)

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या भारतात सर्वात लोकप्रिय आणि आदरणीय गायिका होते. ज्यांचा ७ दशकांचा कार्यकाळ यशाने भरलेला आहे. लता मंगेशकर यांच्या आवाजाने ७ दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवलेले आहे. भारतात 'स्वरसम्राज्ञी' लता मंगेशकर यांनी २० भाषांमध्ये ३० हजार पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आले, तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळालेला आहे. लतादीदींनी स्वत:ला पूर्णपणे संगीताकरिता वाहून घेतले होते. भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

हे देखील पहा-

लता दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदूर, मध्य प्रदेश येथे झाला होता. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे एक कुशल थिएटर गायक होते. दीनानाथजींनी लतादीदी ५ वर्षांच्या असताना त्यांना संगीत शिकवायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर आशा, उषा आणि मीना या त्यांच्या बहिणीही गायन शिकायचे. लतादीदींनी 'अमान अली खान साहिब' आणि नंतर 'अमानत खान' यांच्याकडे देखील गाण्याचे शिक्षण घेतले होते. (Lata Mangeshkar More than 30000 songs in 20 languages)

लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजामुळे त्यांच्या प्रतिभेची लवकर ओळख झाली. वयाच्या ५ वर्षी त्यांना पहिल्यांदा नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यांची सुरुवात अभिनयापासून झाली असली, तरी त्यांची आवड फक्त संगीतामध्ये होती. १९४२ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. यावेळी त्या फक्त १३ वर्षांच्या होते. नवयुग फिल्म कंपनीचे मालक आणि त्यांच्या वडिलांचे मित्र मास्टर विनायक (विनायक दामोदर कर्नाटकी) यांनी त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आणि लता मंगेशकर यांना गायिका आणि अभिनेत्री बनण्यास मदत केली होती.

लता मंगेशकर यांना आपले स्थान निर्माण करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागला आहे. बारीक आवाजामुळे अनेक संगीतकारांनी सुरुवातीला त्यांना काम देण्यास नकार दिला होता. लता मंगेशकरांची तुलना त्या काळात प्रसिद्ध पार्श्वगायिका नूरजहा यांच्याशी करण्यात आली होती. पण, हळूहळू त्यांची आवड आणि प्रतिभा यांच्या जोरावर त्यांना काम मिळू लागले होते. (Lata Mangeshkar More than 30000 songs in 20 languages)

जास्तीत जास्त गाणी रेकॉर्ड करण्याचा मान देखील लता मंगेशकरांच्या नावावर आहे. लता मंगेशकर यांनी २० भाषांमध्ये ३० हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. फिल्मी गाण्यांव्यतिरिक्त त्यांनी नॉन फिल्मी गाणीही उत्तम गायली आहेत. १९४५ मध्ये, उस्ताद गुलाम हैदर, लतादीदींना त्यांच्या आगामी चित्रपटाकरिता एका निर्मात्याच्या स्टुडिओमध्ये घेऊन गेले होते. ज्यामध्ये कामिनी कौशल मुख्य भूमिकेत होती. त्या चित्रपटकरिता लतादीदींनी पार्श्वगायन करावे, अशी त्यांची इच्छा होती. पण, गुलाम हैदर यांची निराशा झाली होती.

१९४७ मध्ये वसंत जोगळेकर यांनी लतादीदींना त्यांच्या 'आपकी सेवा में' या चित्रपटामध्ये देखील गाण्याची संधी दिली होती. या चित्रपटामधील गाण्यांवरून लतादीदींची खूप चर्चा झाली होती. यानंतर लतादीदींनी मजबूर चित्रपटातील 'अंग्रेजी छोरा चला गया' आणि 'दिल मेरा तोडा ही मुझे कहीं का ना छोड तेरे प्यार ने' सारख्या गाण्यांनी स्वतःला सिद्ध केले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

SCROLL FOR NEXT