Lata Mangeshkar: लता मंगेशकर अन् किशोर कुमारांनी गायलेली प्रसिद्ध प्रेमगीतं, आजही करतायेत राज

भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे.
Lata Mangeshkar: लता मंगेशकर अन् किशोर कुमारांनी गायलेली प्रसिद्ध प्रेमगीतं, आजही करतायेत राज
Lata Mangeshkar: लता मंगेशकर अन् किशोर कुमारांनी गायलेली प्रसिद्ध प्रेमगीतं, आजही करतायेत राजSaam Tv
Published On

मुंबई: भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना आधी कोरोना आणि नंतर न्युमोनियाची लागण झाली होती. (Famous love songs sung Lata Mangeshkar Kishore Kumar)

हे देखील पहा-

नीले नीले अम्बर पर, चाँद जब आये, प्यार बरसाए, हमको तरसाये...लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी उत्तम गायलेली गाणी आहेत. ज्येष्ठ गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम गाणी गायली आहेत. त्यापैकी खूप गाणी त्यांनी किशोर कुमारबरोबर गायली आहेत. या २ दिग्गज गायकांप्रमाणे गाण्याचे प्रत्येक तरुण गायकाचे स्वप्न असते. पण लताजींच्या आयुष्यामध्ये एक वेळ अशी आली होती. जेव्हा त्यांनी किशोर कुमारबरोबर गाणे टाळले होते. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी 'तुम आ गये हो नूर आ गया है', 'आप की नजरों ने समझा' याबरोबरच अनेक हिट गाणी एकत्र गायली आहेत.

आज देखील लोक त्यांची प्रसिद्ध गाणी गात आहेत आणि गुणगुणत असतात. पण, काही काळानंतर लताजींनी किशोर कुमारबरोबर गाणं रेकॉर्ड करण्यास नकार दिला होता. याचे कारण म्हणजे किशोर कुमार यांची विनोद करण्याची सवय, यामुळे लता मंगेशकर नाराज होते. जेव्हा गीतकार समीर 'द कपिल शर्मा शो'मध्ये पोहोचले होते तेव्हा त्यांनी हा मजेदार प्रसंग त्यांनी यावेळी सांगितला होता. गीतकार समीरने कपिल शर्मा शोमध्ये सांगितले होते की, किशोर कुमार यांच्या बरोबर संबंधित ही गोष्ट लताजींनीच त्यांना सांगितली होती.

Lata Mangeshkar: लता मंगेशकर अन् किशोर कुमारांनी गायलेली प्रसिद्ध प्रेमगीतं, आजही करतायेत राज
Lata Mangeshkar passes away: लता दीदींच्या अडचणीत पाठीशी राहायचे बाळासाहेब ठाकरे

ते म्हणत होते की, 'लताजी आणि आशाजींनी काही काळानंतर किशोर कुमारबरोबर गाणी गाण्यास नकार दिला होता. लताजींनी समीरला सांगितले की किशोर दा यायचे आणि आम्हा दोघींना विनोद सांगून खूप हसवत असत. यामुळे आम्हाला कंटाळा यायचा आणि ते स्वतः मात्र गाायचे. यानंतर लताजींनी किशोर कुमारबरोबर गाणे गाण्यास नकार दिला होता. मात्र, नंतर दोघे परत गाण्यासाठी एकत्र आले. गीतकार समीरने 'द कपिल शर्मा शो'मध्ये पुढे सांगितले की, 'लता आणि किशोर यांना खूप दिवसांनी गाण्याकरिता एकत्र यावे लागले.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com