Lapataganj actor Arvind Kumar Death Facebook
मनोरंजन बातम्या

Lapataganj Actor Passes Away : 'लापतागंज' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याचे निधन ; शूटिंगच्या सेटबाहेरच आला हृदयविकाराचा झटका

Lapataganj Actor Arvind Kumar : 'लपतागंज'मधील अभिनेते अरविंद कुमार यांचे 10 जुलै रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Pooja Dange

Lapataganj actor Arvind Kumar Dies : सब टीव्हीवरील लोकप्रिय शो 'लपतागंज'मधील अभिनेते अरविंद कुमार यांचे 10 जुलै रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुळचे उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी अरविंद कुमार यांच्या निधनाची बातमी अभिनेता विनोद गोस्वामी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर दिली होती.

त्यांनी पोस्ट करत लिहिले होते - अतिशय दुःखद बातमी, आमचे चांगले मित्र अरविंद जी आता आमच्यात नाहीत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. लापतागंज ही मालिका SAB TV वर ऑक्टोबर 2009 ते 15 ऑगस्ट 2014 पर्यंत टेलिकास्ट होत होती. त्यात अरविंद कुमार यांनी चौरसियाची भूमिका साकारली होती.

अरविंद कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना, लापतागंजमध्ये एलिझाची भूमिका करणाऱ्या कृष्णा भट्ट यांनी सांगितले की, 10 जुलै रोजी सकाळी तो एका प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी नायगावला निघाले होते. प्रोजेक्टमधील लोकांच्या म्हणण्यानुसार, त्याला लोकेशनच्या बाहेर हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

अरविंद कुमार यांच्या निधनाची बातमी समजताच लापतागंजमधील अनेक सहकारी कलाकार त्यांच्या घरी गेले. कृष्णा भट्ट व्यतिरिक्त, लपतागंजमध्ये गुड्डूची भूमिका साकरणारे आशुतोष सिन्हा म्हणाले की अरविंद कुमार एक उत्तम अभिनेता आणि माणूस होता.

लपतागंजमध्ये लल्लनजीची भूमिका साकारणाऱ्या राकेश श्रीवास्तव यांनी अरविंद कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि तो खूप चांगला माणुस असल्याचे सांगितले. तो कष्टाळू होता आणि प्रत्येक परिस्थितीशी लढला.

लपतागंज मालिकेदरम्यानच अरविंद कुमारचे लग्न झाले होते. जेव्हा जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीची काळजी वाटायची किंवा काही सल्ला घ्यायचा असेल तेव्हा तो मला फोन करायचा. अरविंद आता आपल्यात नाहीत यावर माझा विश्वास बसत नाही. त्याला तीन लहान मुली आहेत. त्याच्या पत्नीचे नाव सरला आहे. (Latest Entertainment News)

अरविंद कुमार यांचा जन्म पश्चिम उत्तर प्रदेशातील शामली येथे झाला. राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर, अरविंद कुमार यांनी 1998 मध्ये हिंदी रंगभूमीवर प्रवेश केला आणि अनेक नाटकांमध्ये काम केले. 2004 मध्ये त्याने मुंबई गाठली आणि आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

सब टीव्हीच्या 'लपतागंज' या डेली शोमध्ये त्यांनी 5 वर्षे चौरसियाची भूमिका साकारली होती. अरविंद कुमार यांनी क्राइम पेट्रोल, सावधान इंडियाचे अनेक एपिसोडिक शो केले. अरविंद चीनी कम, अंडरट्रायल, रामा राम क्या है ड्रामा, मॅडम मुख्यमंत्री या चित्रपटांमध्येही (Movie) दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT