Kangana Ranaut On Karan Johar : 'मूव्ही माफियां'शी लढून मी काय मिळवलं? करण जोहर, सोनम कपूरचा व्हिडिओ शेअर करत कंगनानं दिलं उत्तर

Karan Johar - Sonam Kapoor : करण जोहर आणि सोनम कपूरची क्लिप कंगनाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
Kangana Ranaut reacts to Sonam Kapoor's jibe at her English
Kangana Ranaut reacts to Sonam Kapoor's jibe at her EnglishSaam TV

Kangana Ranaut reacts to Sonam Kapoor : अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा बॉलिवूड कलाकारांना लक्ष केले आहे. कंगना रनौतने करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोची जुनी क्लिप शेअर केली आहे. या व्हिडिओ क्लिपमध्ये सोनम कपूर कंगनाला अस्खलित इंग्रजी शिकण्याची गरज असल्याचे सांगताना दिसत आहे. यावर आता कंगना काय म्हणाली आणि तिने कोणावर हल्ला केला चला जाणून घेऊयात.

करण जोहर आणि सोनम कपूरची ही क्लिप इन्स्टाग्रामवर शेअर करताना कंगना रनौतने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'इतकी वर्षे चित्रपट माफियाशी लढून मी एकच गोष्ट कमावली आहे की, मी आता कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या इंग्रजीसाठी खिल्ली उडवत नाही. तसे, हा शो अधिकृतपणे कायमचा बंद झाला आहे. (Latest Entertainment News)

Kangana Ranaut reacts to Sonam Kapoor's jibe at her English
Bigg Boss OTT 2 Update : बिग बॉसच्या घरात मोठी घडामोड; वाइल्ड कार्डने होणार धमाकेदार एन्ट्री, आल्या आल्या नवा टास्क पूर्ण करणार

कंगनाने पुढे लिहिले की, 'वयाच्या 24 व्या वर्षी इतका त्रास सहन केल्यानंतर, आता पुन्हा येत आहे ते चुकवू नका.'

या व्हिडिओमध्ये करण जोहर सोनम कपूरला विचारतो की, जर त्याने अस्खलित इंग्रजी बोलण्याची ताकद दिली तर तो कोणाला द्याल ? सोनम सुरुवातीला याचे उत्तर द्यायला तयार नव्हती, पण नंतर कंगनाच्या फॅशन सेन्सचे कौतुक करते आणि तिला गरज असल्याचे सांगते.

कंगना रनौत 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 20 ऑक्टोबर 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या 'तेजस'मध्येही दिसणार आहे. त्याचबरोबर करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' देखील रिलीजसाठी सज्ज आहे.

सोनम कपूरने ओटीटीवर पदार्पण केले आहे. जिओ सिनेमा अॅपवर रिलीज झालेल्या 'ब्लाइंड'मध्ये ती दिसली आहे. याशिवाय ती लंडनमध्ये पती आनंद आहुजा आणि मुलगा वायुसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com