Lagnanantar Hoilach Prem SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lagnanantar Hoilach Prem : पार्थ पुन्हा काव्याच्या गळ्यात घालणार मंगळसूत्र; डिझाइनही आहे खूप खास, पाहा VIDEO

Lagnanantar Hoilach Prem Serial Update : 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत हळूहळू प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहे. मैत्रीनंतर पार्थ आणि काव्याच्या नात्यात प्रेम खुलत आहे. पार्थ काव्याला स्पेशल गिफ्ट देणार आहे.

Shreya Maskar

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत पार्थ आणि काव्याचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

पार्थ काव्यासाठी स्पेशल गिफ्ट घेऊन येणार आहे.

'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेची कथा चाहत्यांना खूप आवडत आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanantar Hoilach Prem) मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. आता कुठेतरी पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी यांच्या प्रेमाच्या नात्याला सुरुवात होत आहे. नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मालिकाचा हिरो पार्थ-काव्याला एक खास गिफ्ट देणार आहे.

मालिकेत हळूहळू पार्थ-काव्याची मैत्री होताना दिसत आहे. यांच्या नात्यात प्रेम खुलायला लागले आहे. काव्या देशमुखांची खूपच काळजी घेताना दिसत आहे. मानिनीने देखील काव्याचा सर्व भूतकाळ विसरून तिला प्रेमाने पुन्हा आपलेसे केले आहे. प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, पार्थ आईला सांगतो की, मला काव्याला एखादा दागिना भेट करायचा आहे. तेव्हा आई मंगळसूत्र भेट करण्याचे सुचवते.

"आधी मनाविरुद्ध लग्नात मंगळसूत्र घातल होत. आता जे देशील ते मानाने मिरवेल..." असे पार्थची आई बोलते. आता पार्थ काव्याला एका खास डिझाइनचे मंगळसूत्र देणार आहे. मंगळसूत्राची डिझाइन खूप स्पेशल असणार आहे. ती डिझाइन देखील काव्या नकळत पार्थला सांगून जाते. पार्थ काव्याला 'काव्यार्थ' लिहिलेले मंगळसूत्र देणार आहे. कारण काव्या कॉफी घेऊन येते तेव्हा तिचा पाय घसरतो आणि कॉफी पार्थ काव्याचे नाव लिहिलेल्या पानावर पडते. त्यातून मंगळसूत्राच्या डिझाइनची हिंट पार्थला मिळते.

रोमँटिक प्रोमोला खास कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "पार्थ काव्याला देणार खास मंगळसूत्र..." 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 7 वाजता पाहायला मिळते. काव्या आणि पार्थ एकमेकांसमोर आपले प्रेम कधी व्यक्त करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ZP Election : झेडपीसाठी या जिल्ह्यात युतीची घोषणा, भाजप अन् शिंदेसेना किती जागा लढणार?

Maharashtra Live News Update: समरजीत घाटगे यांनी फेसबुक पेजवरून हटवली तुतारी, लवकरच शरदचंद्र पवार गटाला राम राम करणार

Mumbai Ahmedabad Expressway: गुजरातकडून येणाऱ्या वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, वाचा कारण

Glowing skin tips: व्हाईटहेड्स परत कधीच येणार नाहीत; या ६ सिक्रेट स्किन केअरचा करा वापर

Rajkummar Rao-Patralekha: आमच्या बाळाचं नाव काय? राजकुमार राव-पत्रलेखाने शेअर केलं त्यांच्या मुलीचं क्यूट नाव

SCROLL FOR NEXT