Lagnanantar Hoilach Prem  SAAM TV
मनोरंजन बातम्या

VIDEO : जीवा-काव्याच्या नात्यात दुरावा; छातीवरचा टॅटू मिटवला, 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत नवा ट्विस्ट

Lagnanantar Hoilach Prem Update : 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत आता नवीन आणि धक्कादायत ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. जीवा खूप भयंकर पद्धतीने काव्याच्या नावाचा टॅटू मिटवणार आहे.

Shreya Maskar

'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanantar Hoilach Prem ) ही मालिका सध्या प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काव्या घरच्यांना जीवा आणि तिच्या नात्यांच खरं सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर जीवा काव्याच्या या सर्व गोष्टींना थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आता मालिकेत जीवा आणि काव्याच नातं कोणते वळण घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. काव्या आणि पार्थचे लग्न होण्यापूर्वी काव्या आणि जीवा एकमेकांवर प्रेम करत असतात.

लग्नानंतरही काव्या जीवावर प्रेम करते. मात्र जीवाच्या मनात नेमकं काय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मालिकेत जीवाचे लग्न नंदिनीशी होते. जीवाला नंदिनी आवडू लागली आहे का? जीवा आणि काव्याच्या नात्यांचे पुढे काय होणार? हे सर्वच प्रश्न प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहेत. मालिकेत तुम्ही पाहू शकता की, जीवा नंदिनीबरोबर लग्न निभावण्याचा निर्णय घेतो आणि तिच्याशी चांगले वागायला सुरूवात करतो. मात्र काव्याकडून हे होत नाही. त्यामुळे ती तिचे आणि जीवाचे नातं नंदिनी आणि पार्थसमोर उघड करायचं ठरवते.

'लग्नानंतर होईलच प्रेम' काव्या तिचे आणि जीवाचे फोटो लावलेल्या खोलीत नंदिनी आणि पार्थला घेऊन जाते. मात्र तिचा तो प्लान फसतो. कारण फोटो आधीच कोणीतरी काढलेले असतात. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, काव्या आणि जीवामध्ये मोठं भांडण होत. तेव्हा काव्या त्याला विचारते की, "तू सगळं लपवशील पण या टॅटूचं काय करशील?" तेव्हा जीवा समोर पेटत असलेल्या शेकोटीतून जळत्या लाकडाच्या साहाय्याने टॅटू मिटवताना दिसत आहे. तो वेदनेने किंचाळतो.

नंदिनी लांबून जीवा जळत्या लाकडासोबत टॅटू मिटवताना पाहते आणि धावत येते. जीवाच्या या कृतीमुळे काव्याला मोठा धक्का बसतो. टॅटू मिटवल्याने काव्या आणि जीवाच्या नात्याचे पुढे काय होणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. आता जीवाच्या या कृतीमुळे या चौघांच्या आयुष्यात नवं कोणते वादळ येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिका 'स्टार प्रवाह' वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

Sabudana Thalipeeth Recipe : आषाढी एकादशीसाठी झटपट गरमा गरम साबुदाणा थालीपीठ रेसिपी

Neena Gupta Birthday: लग्न न करता झाली आई, मुलीसाठी केला संघर्ष; नीना गुप्ताने अशा प्रकारे मिळवले इंडस्ट्रीत हक्काचे स्थान

SCROLL FOR NEXT