Famous Actress Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actress Wedding : 'क्यूंकी सास भी...'; फेम अभिनेत्रीनं गुपचूप बांधली लग्नगाठ, पाहा खास PHOTOS

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Actress Wedding : 'क्यूंकी सास भी कभी बहू थी ' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेल्या अभिनेत्रीने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचे खास फोटो पाहा.

Shreya Maskar

'क्यूंकी सास भी कभी बहू थी ' फेम अभिनेत्री गुपचूप लग्न बंधनात अडकली.

वयाच्या 41 च्या वर्षी एका अभिनेत्यासोबत तिने लग्नगाठ बांधली.

लग्नाचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मनोरंजन क्षेत्रातून आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्रीने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. 'क्यूंकी सास भी कभी बहू थी ' फेम अभिनेत्री आश्लेषा सावंत नुकतीच विवाह बंधानात अडकली आहे. वयाच्या 41 च्या वर्षी तिने अभिनेता संदीप बसवानासोबत आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरूवात केली आहे. लग्नाचे सुंदर फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

आश्लेषा सावंत आणि संदीप बसवाना अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. या जोडप्याने वृंदावन येथील चंद्रोदय मंदिरात लग्न केले. आश्लेषा आणि संदीप यांनी कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न केले. त्यांचे लग्न पारंपरिक विधींनुसार झाले. शेअर केलेल्या फोटोंमध्ये ते लग्न विधी करताना दिसत आहेत. तसेच मंदिराच्या परिसरात छान फोटोशूट त्यांनी केले आहे. त्यांनी या फोटोंना खूप खास कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "आणि अगदी अशाच प्रकारे आम्ही आयुष्याच्या नवीन प्रवासाला सुरूवात केली. मिस्टर अँड मिसेस झालो...सर्व आशीर्वादांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत."

लग्नाचा लूक

अभिनेत्री आश्लेषा सावंतने लग्नासाठी सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती. त्यावर मॅचिंग ज्वेलरी, सुंदर मेकअप, बांगड्या, केसांचा बन बांधला होता. आश्लेषा लग्नात खूपच सुंदर दिसत होती. तिचा ब्राइडल लूक चाहत्यांना खूप आवडला. तर संदीपने ऑफ-व्हाइट शेरवानी आणि मॅचिंग वास्कटमध्ये खूपच सुंदर दिसत होता. त्यांनी मॅचिंग फेटा आणि शाल घेऊन त्याने लूक पूर्ण केला.

सध्या आश्लेषा आणि संदीपला कलाकार आणि चाहते नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. आश्लेषा आणि संदीपने 23 वर्ष एकत्र राहिल्यावर लग्नगाठ बांधली आहे. आश्लेषाला 'क्यूंकी सास भी कभी बहू थी ' मुळे खूप लोकप्रियता मिळाली. संदीपने देखील आजवर अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या आयशर टेम्पोचा भीषण अपघात

Breaking : धक्कादायक! मुंबई, नागपूरसह ४ कोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी, राज्यात खळबळ

Five Hundred Rupees Note: ५०० रुपयांच्या नोटेवर किती भाषा असतात?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो eKYC झाली का? फक्त १२ दिवसांचा वेळ, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Accidents : पुण्यात भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, जालना अन् बुलडाण्यात भयंकर दुर्घटना, राज्यात ७ जण ठार

SCROLL FOR NEXT