Kusha Kapila Announces Divorce Instagram
मनोरंजन बातम्या

Kusha Kapila Divorced: प्रसिद्ध कॉमेडियन कुशा कपिलाचा घटस्फोट, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं कारण

Kusha Kapila Announces Divorce: प्रसिद्ध कॉमेडियन कुशा कपिला पती जोरावर सिंग अहलुवालियापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे.

Chetan Bodke

Kusha Kapila Announces Separation From Husband: सोशल मीडियावर इन्फ्लूएन्सर कुशा कपिला लवकरच पती जोरावर सिंग अहलुवालिया पासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. तिने वेगळा होण्याचा निर्णय चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिच्या या निर्णयामुळे फॅन्सला धक्का बसला आहे.

कुशाने आज सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधित माहिती देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये कुशाने लग्नाच्या सहा वर्षांनंतर पती जोरावर सिंह अहलुवालियापासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेतांना आपल्याला खूप त्रास झाला असून आम्ही हा निर्णय एकत्र घेतल्याचं अभिनेत्रीने सांगितलं.

कुशा आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये बोलते. “दोघांनीही एकत्रित वेगळा होण्याचा निर्णय घेतला. हा कठीण निर्णय घेणं सोप्प नाही. पण आम्हाला माहित आहे, दोघांच्याही आयुष्यातील टप्प्यावर हा निर्णय योग्य आहे. एकमेकांबरोबर शेअर केलेलं प्रेम आणि आयुष्य आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. पण वाईट गोष्ट म्हणजे, आम्ही एकमेकांमध्ये ज्या गोष्टी शोधत होतो, त्या नाहीत. नातं टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केला. ” (Bollywood)

तर पुढे अभिनेत्री पुढे म्हणते, “प्रत्येकाच्या नात्याचा शेवट हा नेहमीच फार वेदनादायक असतो. आमच्यासोबतच कुटुंबासाठीही ही एक कठीण परिक्षा होती. पण, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळाला आहे. आम्हाला आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागेल. नात्यातील ही जखम भरण्यासाठी फारच वेळ लागेल. माझं आणि जोरावरचं लक्ष एकमेकांना प्रेम, आदर आणि पाठिंबा देत या गोष्टीतून बाहेर पडणे हे आहे. आम्ही एक चांगले पती- पत्नी आहोतच, पण एक चांगले पालक देखील आहेत. मुलीवर प्रेम करून एकमेकांचे चीअरलीडर्स आणि सपोर्ट सिस्टम बनण्याचा प्रयत्न करू.” (Entertainment News)

कुशा कपिलाच्या कामाबद्दल बोलायचे तर, ती सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे. सोबतच ती एक नावाजलेली कॉमेडियन देखील आहे. काही दिवसांपूर्वी ती फिल्म फेस्टिव्हलच्या डेब्यूवरुन चर्चेत आली होती. मात्र यावेळी कुशा कपिला वैयक्तिक आयुष्यावरुन चर्चेत आलेली आहे. कुशाने जोरावर सिंह अहलूवालियासोबत २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांच्याही लग्नाची सोशल मीडियावर तुफान चर्चा देखील झाली होती. त्यांनी सोशल मीडियावर अनेकदा एकमेकांबद्दल काही मजेशीर व्हिडीओ देखील शेअर केल्या होत्या. कुशाचा हा निर्णय ऐकून चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. (Bollywood Actress)

कुशाचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फार मोठा चाहतावर्ग आहे. काही हटके व्हिडीओ, मजेशीर व्हिडीओ युट्यूबसोबत इंस्टाग्रामवर देखील शेअर करत असते. कुशा काही टीव्ही शो आणि सिनेमांमध्ये दिसलेली आहे. सोबतच तिने काही अवॉर्ड फंक्शनमध्ये देखील होस्टिंगची जबाबदारी सांभाळली होती. दोघांचीही २०१२ मध्ये भेट झाली होती. जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१७ मध्ये दोघांनी साध्या पद्धतीने लग्न केलं. (Social Media)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Cylinder Price: दसऱ्याआधी महागाईचा चटका, गॅस सिलिंडरच्या दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

SCROLL FOR NEXT