Kumud Mishra and Kajol in Lust Stories 2 Saam TV
मनोरंजन बातम्या

Kajol - Kumud Mishra In Lust Stories 2 : आमचं बॉन्डिंग... लस्ट स्टोरीज 2 मधील काजोलसोबतच्या इंटिमेट सीनवर अभिनेत्याची प्रतिक्रिया

Kumud Mishra Talks About His Intimate Scenes : लस्ट स्टोरीजमधील अभिनयामुळे काजोल आणि कुमुद मिश्रा यांची खूप प्रशंसा होत आहे.

Pooja Dange

Kumud Mishra On Intomes Scene With Kajol : कुमुद मिश्रा हे बॉलिवूडमधील एक अनुभवी कलाकार आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. पण अलीकडेच त्यांनी त्यांची छाप सोडली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला लस्ट स्टोरीज-२ या अँथॉलॉजी चित्रपटातील एका कथेत काजोलसोबत कुमुद मुख्य भूमिकेत दिसले होते.

लस्ट स्टोरीजमधील अभिनयामुळे काजोल आणि कुमुद मिश्रा यांची खूप प्रशंसा होत आहे. दोघांवर शूट केलेले इंटिमेट सीन्सही चर्चेत आहे. कुमुद मिश्रा यांची यावर प्रतिक्रिया आली आहे. 'इंटिमेट सीन करताना आम्हाला कोणतीही अडचण आली नाही, माझ्या आणि काजोलमध्ये पहिल्या दिवसापासून चांगले बॉन्डिंग होते,' असे ते म्हणाले आहेत.

बॉलिवूड लाइफशी संवाद साधताना कुमुद म्हणले की, काजोल ज्या पद्धतीने पात्र साकारते ते पाहण्यासारखे आहे. काजोल एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या सहकलाकारांना खूप कम्फर्टेबल करते.

याआधी काजोल देखील ऑन-स्क्रीन फीमेल प्लेजरविषयी बोलली होती. एका चॅटमध्ये काजोल म्हणाली होती की, पूर्वीच्या काळात खूप मोकळेपणा होता. आपल्या अनेक ग्रंथांमध्ये याबद्दल सांगितले आहे, परंतु मध्यंतरी अशी वेळ आली की आपण याविषयी बोलणे बंद केले. पण शेवटी या विषयावर मोकळेपणाने बोलायला हवे, हे पुन्हा नॉर्मल करायला पाहिजे.

काय आहे कुमुद-काजोलची कहाणी?

अमित रवींद्रनाथ शर्मा यांनी 'लस्ट स्टोरीज-2' या अँथॉलॉजी चित्रपटाच्या 'तिलचट्टा' या चौथ्या कथेचे दिग्दर्शन केले आहे. यामध्ये काजोलने देवयानी ही गृहिणीची भूमिका साकारली आहे. पूर्वी ती वेश्याव्यवसाय करत असे. तर, कुमुद मिश्रा या चित्रपटात काजोलच्या पती सूरजची भूमिका करत आहेत, ज्याचे आजोबा राजा होते.

सूरज एक दारुडा आहे ज्याने आपली संपत्ती गमावली आहे, तरीही तो स्वतःला राजा समजत आहे. तो सतत आपल्या पत्नीला आठवण करून देतो की ती वेश्या होती. तसेच तो तिला मारहाण करतो आणि जबरदस्ती करतो. चित्रपटात, देवयानी सूरजपासून मुक्त होण्यासाठी एक प्लॅन करते, परंतु परिणामी तिचे आयुष्य उद्ध्वस्त होते.

कुमुदने श्रेय दिग्दर्शक अमितला दिले

कुमुद मिश्रा यांनीही दिग्दर्शक अमित रवींद्रनाथ शर्मा यांचे कौतुक केले. कुमुद या चित्रपटात मद्यपी आणि हिंसक पतीची भूमिका साकारत आहे. ही भूमिका अतिशय भयानक आणि डार्क होती. कुमुदने सांगितले की, सुरुवातीला मला माझ्या पात्राची आणि काही दृश्यांची भीती वाटत होती, पण अमितमुळे मी ते करू शकलो आणि आज त्याचे परिणाम तुमच्या सर्वांसमोर आहेत. (Latest Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ओवेसींवर टीका करताना मंत्री आकाश फुंडकर यांची जीभ घसरली.

Monday Horoscope: रखडलेली कामे पूर्ण, ५ राशींना अचानक धनलाभ; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Rohit Pawar: 'तू शांत बस नाहीतर...; रवींद्र धंगेकरांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दादागिरी? रोहित पवारांचा फडणवीसांवर आरोप

Helicopter Crash : टेकऑफनंतर लगेच खाली कोसळले हेलिकॉप्टर, ५ जण जखमी; पाहा थरारक Video

Gopichand Padalkar: मुस्लिम भारताला युद्धाचं घर मानतात; गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य चर्चेत, VIDEO

SCROLL FOR NEXT