Khatron Ke Khiladi Season 13 Details : टेलिव्हिजन सृष्टीत 'खतरो के खिलाडी' हा लोकप्रिय रिअॅलिटी शो कायमच चर्चेत असतो. 'खतरों के खिलाडी १३' लवकरच कलर्स या टीव्ही चॅनलवर प्रक्षेपित होणार आहे. तर या शोच्या प्रक्षेपणाची तारीख आणि वेळ आता समोर आली आहे.
डर के आगे जीत है असं म्हणणं सोपं आहे. पण खऱ्या आयुष्यात कोणत्या प्राण्यासमोर जाणे किंवा उंच बिल्डिंगवरुन विचित्र स्टंट करणे, तेवढेच भीतीदायक आहे. हे सर्व प्रेक्षकांना लवकरच एका शोच्या माध्यमातून पाहता येणार आहे. तो म्हणजे 'खतरों के खिलाडी'. खतरों के खिलाडी १३ ची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हा शो येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, मध्यंतरी या शोमधील अनेक अपडेट प्रेक्षकांच्या समोर आले होते.
छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये खतरो के खिलाडीचं नाव अग्रेसर आहे. मागील सीझन संपल्यानंतर प्रेक्षकांना नवीन सीझनची प्रतिक्षा होती. प्रेक्षकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
खतरों के खिलाडी हा रिअॅलिटी शो येत्या १५ जुलैपासून कलर्स टीव्ही या टेलिव्हिजन चॅनलवर प्रक्षेपित होणार आहे. शनिवार- रविवार रात्री ९ वाजता हा शो प्रक्षेपित होणार आहे. खतरों के खिलाडी १३ चे अनेक प्रोमो कलर्सच्या सोशल मीडियावर पेजवर शेअर केले आहेत.
'खतरों के खिलाडी १३' चे शुटिंग दक्षिण अफ्रिकेतील केप टाउन शहरामध्ये झाले आहे. या शोमध्ये शिव ठाकरे, रूही चतुर्वेदी, रोहिन रॉय, अंजली आनंद, डिनो जेम्स, डेजी शाह, रश्मीत कौर, नायरा बनर्जी, अंजुम फकीह, अर्चना गौतम, ऐश्वर्या शर्मा, सुंदुस मौफकीर, अर्जित तनेजा और शीजान खान हे स्पर्धक स्टंट करताना दिसणार आहे.
या सीझनची खास गोष्ट म्हणजे या शोमध्ये हिना खान,अब्दू रोझीक या दोन स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे. अनेकदा सोशल मीडियावर अब्दुच्या एन्ट्रीबद्दल चर्चा झाली होती. अखेर अब्दुची वाईल्ड कार्डच्या रूपात एन्ट्री झाली आहे.
या शोमधील शुटिंगदरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शोचं शुटिंग संपवून सर्व स्पर्धक पुन्हा मायदेशी परतले असून या सर्व स्पर्धकांचे एअरपोर्टवरील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.