Monalisa saam tv
मनोरंजन बातम्या

Monalisa : लग्नानंतर 'मोनालीसा'ला मिळाली जीवे मारण्याची धमकी, नवऱ्यासोबत VIDEO शेअर करत मागितली मदत

Monalisa Viral Video : महाकुंभ मेळ्यामुळे प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिने व्हिडीओत आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली असल्याचा खुलासा केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाकुंभ मेळ्यामुळे प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाने पळून जाऊन मुस्लीम बॉयफ्रेंडसोबत लग्न केले.

मोनालिसाला लग्नानंतर जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

मोनालिसाने नवऱ्यासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती मदत मागताना दिसत आहे.

महाकुंभ व्हायरल गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोनालिसा भोसले नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. तिने एका मुस्लिम मुलाशी लग्न केले आहे. मोनालिसा आणि फरमान खान त्यांच्या आंतरधर्मीय विवाहामुळे वादात अडकले आहेत. मोनालिसाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओत मोनालिसाने सांगितले की, तिली जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

मोनालिसाने एक व्हिडिओ शेअर करून प्रसारमाध्यमे, मुख्यमंत्री आणि सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये मोनालिसा आणि फरमान दोघांनीही मदतीसाठी आवाहन केले आहे, ते म्हणाले, "मी हा व्हिडिओ एका पत्रासोबत सर्वांना पाठवत आहे, त्यामुळे कृपया आम्हाला मदत करा. आम्हाला उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे." त्यामुळे धमक्यांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणाची विनंती या जोडप्याने केली आहे. त्यांनी ही सर्व माहिती पोलीसांना देखील दिली आहे.

धार्मिक मतभेदांमुळे मोनालिसाच्या कुटुंबाकडून या लग्नाला विरोध झाला. त्यामुळे संरक्षण मिळवण्यासाठी आणि आपला जोडीदार निवडण्याचा हक्क सांगण्यासाठी तिने केरळ पोलीसांकडे धाव घेतली. मोनालिसा भोसलेने मुस्लीम बॉयफ्रेंडसोबत पळून जाऊन लग्न केले आहे. तिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मोनालिसाने तिचा बॉयफ्रेंड फरमान खानसोबत लग्न केले आहे. दोघांनी केरळमध्ये लग्नगाठ बांधली. मोनालिसा मूळची मध्य प्रदेशातील इंदूरची आहे. तर फरमान खान मूळचा महाराष्ट्रातील आहे. तसेच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. मोनालिसा आणि फरमानने आधी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर तिरुवनंतपुरम येथील अरुमानूर नैनार मंदिरात लग्न केले.2025 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला होता. कुंभमेळ्यात मोनालिसा रूद्राक्ष माळा विकायची.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT