Aarti Singh Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aarti Singh Wedding: गोविंदा-कृष्णा अभिषेकमध्ये पुन्हा खटकलं का? आरती सिंहच्या लग्नाला येण्यावरून काश्मीरा शाह बरंच काही म्हणाली...

Will Govinda Attend Aarti Singh Wedding: टीव्ही अभिनेत्री आरती सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आरतीच्या लग्नाआधीच्या सर्व विधींना सुरुवात झाली आहे. आरतीच्या मेंहदीचे, हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात आरतीचे मामा म्हणजे गोविंदा कुठेच दिसले नाहीत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टीव्ही अभिनेत्री आरती सिंह लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. आरतीच्या लग्नाआधीच्या सर्व विधींना सुरुवात झाली आहे. आरतीच्या मेंहदीचे, हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात आरतीचे मामा म्हणजे गोविंदा कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. याबद्दल कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीर शाहने खुलासा केला आहे.

गोविंदा आणि त्यांचा भाचा कृष्णा अभिषेकमध्ये वाद सुरु आहेत. त्यामुळे ते दोघेही एकमेकांशी बोलत नसल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळेच भाची आरती सिंहच्या लग्नाला गोविंदा हजेरी लावणार की नाही, असा प्रश्न कश्मीराला विचारण्यात आले आहे. कश्मीराने याबाबत म्हटले आहे की, 'शर्मा कुटुंबियांनी गोविंदा यांना लग्नाची पत्रिका पाठवली आहे. आम्ही त्यांना लग्नासाठी आमंत्रित केले आहे. आम्ही लग्नात त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत. आम्ही त्यांचे आदराने स्वागत करु. ते माझ्या सासऱ्यांच्या जागी आहेत. त्यामुळे मी त्यांच्या पाया पडेन. त्यांचा आदर करेन. त्यांची माझ्यावर आणि कृष्णावर नाराजी असेल. परंतु याचा आरतीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी आरतीच्या लग्नाला हजेरी लावावी अशी माजी मनापासून इच्छा आहे'.

'आरतीचे लग्न हा आमच्यासाठी खूप भावूक क्षण आहे. आम्ही तिच्या हळदीच्या कार्यक्रमाला खूप भावूक झालो होतो. मी तिला खूप वर्षांपासून ओळखते, तिच्यासाठी मी खूप आनंदी आहे', असंही ती म्हणाली.

आरती सिंह दिपक चौहानसोबत लग्नगाठ बांधत आहे. दिपक आणि आरतीचे अरेंज मॅरेज आहे. दिपक हा नवी मुंबई येथील व्यावसायिक आहे. आरती २५ एप्रिलला इस्कॉन मंदिरात लग्नगाठ बांधणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT