Krushna Abhishek Reentry in The Kapil Sharma Show Instagram @krushna30
मनोरंजन बातम्या

Krushna Abhishek Comeback In TKSS: तो पुन्हा येतोय: द कपिल शर्मा शोमध्ये कृष्णा अभिषेकची होणार रिएन्ट्री

Krushna Abhishek In The Kapil Sharma Show: कृष्णा अभिषेक पुन्हा एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे.

Pooja Dange

The Kapil Sharma Show Producer Called Krushna Abhishek: गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक सध्या चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून कृष्णा पुन्हा एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये कमबॅक करणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे जूनमध्ये शो बंद होणार असल्याच्या बोलले जात असताना 10 दिवसांपूर्वी निर्मात्यांनी कृष्णाशी संपर्क साधला होता.

बॉम्बे टाइम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, कृष्णा अभिषेकने सांगितले की होय, त्याला नुकताच कपिल शर्मा शोच्या निर्मात्यांकडून कॉल आला होता.

कृष्णाने शोमध्ये परतावे अशी त्यांची इच्छा आहे. निर्मात्यांशी पैशाच्या वादामुळे कृष्णा शोमधून बाहेर पडला होता. मात्र, पैसे आणि करारामुळे यावेळीही या चर्चेवर तोडगा निघाला नाही. (Latest Entertainment News)

पुढे कृष्णाने सांगितले की, प्रकरण पुन्हा पैशावर येऊन अडकले आहे. या सीझनमध्ये पुन्हा येणे त्याच्यासाठी कठीण असल्याचे कृष्णाचे म्हणणे आहे. पण, पुढच्या सीझनमध्ये तो परतेल आणि कपिल आणि कृष्णा पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक मेजवानी घेऊन येतील, अशी अपेक्षा आहे.

शोमधील कृष्णाची सपनाची व्यक्तिरेखा चाहत्यांना खूप आवडली होती. सपनाचे मसाज पार्लर होते. या मसाज पार्लरमध्ये तो विविध प्रकारचे मसाज करायचा. त्या मसाजची नावं ऐकून सगळ्यांचा हसू अगदी अनावर व्हायचं. पुन्हा एकदा त्याच्या पुनरागमनाच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना नक्कीच आनंद झाला आहे.

कृष्णा गोविंदाचा भाचा असल्याने त्याला कलाकारांशी सहज कनेक्ट होता येत. त्यामुळे त्याच्या बोलण्याचा आणि वागण्याचा कोणाला राग देखील येऊ शकत नाही. त्याची कॉमेडी अप्रतिम आहेस. त्यामुळे कृष्णा या शोचा महत्त्वाचा भाग असल्याचे अनेकांना वाटते.

दरम्यान, द कपिल शर्माचा शो यावर्षी जूनमध्ये बंद होणार असल्याची बातमी आहे. मात्र, याबाबतही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कृष्णाने बोलताना याविषयावर त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली. कृष्णा म्हणाला की, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मला शो आणि निर्माते खूप जवळचे आहेत. तसेच मी अर्चना पूरण सिंगसोबतही अनेक वर्षांपासून काम गेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT