KRK Tweet On Akshay Kumar Saam Tv
मनोरंजन बातम्या

KRK Tweet: केआरकेचा अक्षय कुमारवर गंभीर आरोप ट्वीट करत म्हणतो; ‘त्यानेच मला मारण्याची सुपारी...’

KRK Threat: कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनमुळे चर्चेत राहतो. नुकतंच त्याने अक्षय कुमारवर काही धक्कादायक आरोप लावले आहेत.

Chetan Bodke

KRK Tweet On Akshay Kumar: कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनमुळे चर्चेत राहतो. अनेकदा केआरकेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर सडकून टीका केली आहे. केआरकेने शाहरुख खान, सलमान खान आणि अमिर खान सारख्या बॉलिवूड कलाकारांना त्याने त्यांच्या चित्रपटांवरून खूपच ट्रोल केले होते. पण आता यावेळी केआरकेनं त्याच्या मोर्चा एका वेगळ्याच व्यक्तीकडे फिरवला आहे. तो म्हणजे अक्षय कुमार. केआरकेने नुकत्याच एका नव्या ट्वीटमध्ये अक्षयवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.

अक्षय कुमार त्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केआरकेने त्याच्या ट्विटमध्ये केले आहे. उद्या जर माझी हत्या झाली तर, सलमान खान, शाहरुख खान आणि करण जोहर यांच्यामुळे नाही तर अक्षयने माझी हत्या केली, हे सर्वांना कळले पाहिजे. केआरके पुढे खुलासा करत म्हणतो, अक्षय बऱ्याच काळापासून त्याला मारण्याचा प्रयत्न करत होता, कारण केआरके त्याला ‘कॅनडियन कुमार’ म्हणू नये म्हणून तो असं कृत्य करतोय.

केआरके ट्विट करत म्हणतो, “अक्षय कुमार वगळता बॉलिवूडमधील सर्वांशीच माझे चांगले संबंध आहेत. त्यानेच मला तुरुंगात मारण्याची सुपारी दिली होती, मला अटक केली होती. मी भाग्यवान होतो की, मी तुरुंगातून बाहेर आलो. तो पुन्हा मला पोलीस ठाण्यात किंवा तुरुंगात मारण्याची सुपारी देत ​​आहे. मला काही झाले तर त्याला सर्वस्वी अक्षय कुमार जबाबदार असेल. सलमान खान, शाहरूख खान किंवा करण जोहरचा माझ्या हत्येशी काहीही संबंध नसेल.”

पुढील ट्विटमध्ये खुलासा करत केआरके म्हणतो, “ मी अक्षय कुमारला ‘कॅनडियन कुमार’ म्हणू म्हणू नये म्हणून तो असं कृत्य करतोय. मला तुरुंगात पाठवल्याने किंवा मला मारल्याने वास्तव बदलणार नाही, हे अक्षयला कळायला हवं. जग त्याला नेहमीच ‘कॅनडियन कुमार’ म्हणेल. आणि ज्या दिवशी केंद्रात सरकार बदलेल, अक्षय एकतर भारतातून पळून जाईल किंवा तुरुंगात जाईल. हे लिहून ठेवा.” असं म्हणत त्याने ट्वीट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT