Krantijyoti Vidyalay Marathi Medium Saam Tv
मनोरंजन बातम्या

Krantijyoti Vidyalay: 'क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सहा दिवसात गाठला ५ कोटींच्या टप्पा

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: हेमंत ढोमे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर जोरदार गाजत आहे. सहा दिवसांत या चित्रपटाने ५ कोटींच्या टप्पा गाठला आहे.

Shruti Vilas Kadam

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam: हेमंत ढोमे दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर जोरदार गाजत आहे. १ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, सहाव्या दिवसापर्यंत एकूण जवळपास ५ कोटी रुपयांच्या गल्ला करण्यात यशस्वी झाला आहे.

चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि पहिल्या वीकेंडमध्येच हा सिनेमा ३.९१ कोटींच्या जवळपास कमाई करून मराठी सिनेमासाठी बॉक्स ऑफिस दणक्यात सुरूवात करून दिली आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय’ विविध शहरांमध्ये हाऊसफुल्ल होत असून प्रेक्षक गर्दीने चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये येत आहेत.

आकडेवारीनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी सुमारे ७८.४३ लाख, दुसऱ्या दिवशी ४७.८९ लाख, तिसऱ्या दिवशी १.१० कोटी आणि चौथ्या दिवशी १.५५ कोटी रुपये कमावले. पाचव्या दिवशी हा चित्रपट ५२ लाख आणि सहाव्या दिवशी ५२.६ लाख रुपयांची कमाई करुन सुमारे ४ कोटी ९६ लाख रुपयांचे कलेक्शन केले आहे.

हा चित्रपट मुख्यतः मराठी शाळा, मातृभाषेतील शिक्षण आणि सामाजिक भावना यावर आधारित आहे. अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार कास्ट या चित्रपटात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! निवडणूक आयोगाच्या पथकाकडून शिंदेंच्या मंत्र्यांची बॅग तपासणी|VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

Crime News : तुझी शेवटची इच्छा काय? सिगारेट अन् दारू पाजली, नंतर धारदार शस्त्राने वार करत मित्राला संपवलं; हत्याकांडाने पुणे हादरले

Brain Tumor: सतत होणारी डोकेदुखी म्हणजे ब्रेन ट्यूमर तर नाही? न्यूरोसर्जनने सांगितलं कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये

Prajaktaraj: प्राजक्ता माळीने नम्रता संभेरावला दिले खास शिंदेशाही तोडे, PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT