Korean Soprano Singer Lee Sang Eun Found Dead Saam TV
मनोरंजन बातम्या

Korean Singer Death : कोरियन गायिका ली संग युनचे निधन ; परफॉर्मन्सआधी मृतावस्थेत आढळली

Lee Sang Eun Passed Away : प्रसिद्ध सोप्रानो गायक ली संग युनचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले.

Pooja Dange

Korean Soprano Singer Lee Sang Eun Found Dead : प्रसिद्ध सोप्रानो गायक ली संग युनचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले. गायिका तिच्या परफॉर्मन्सच्या आधी वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार,ही घटना कोणताही गैरप्रकार नाही.

गायक ली संग युन लाइव्ह परफॉर्मन्ससाठी तयारी करत होती. ती बराच वेळ स्टेजवर आली नाही. कार्यक्रमाच्या कर्मचाऱ्यांनी ती स्टेजच्या मागे नसल्यामुळे तिचा शोध घेतला. तेव्हा ती महिलांच्या वॉशरूममध्ये मृतावस्थेत आढळली.

ग्योंगबुक अग्निशमन मुख्यालयानुसार, 6 जुलै रोजी रात्री 8:23 च्या सुमारास, ली संग युन समनाक-डोंग गिमचेन-सी येथील कल्चर अँड आर्ट सेंटरच्या 3ऱ्या मजल्यावरील लेडीज वॉशरूममध्ये गायिका मृतावस्थेत आढळून आली. ली संगला तात्काळ आपत्कालीन बचाव पथकाद्वारे जवळच्या रुग्णालयात नेले, मात्र, तिने तोपर्यंत जगाचा निरोप घेतला होता. (Latest Entertainment News)

मोक्पो म्युनिसिपल कॉयरच्या सहकार्याने आयोजित केलेल्या गिमचेओन म्युनिसिपल कॉयरच्या 33 व्या कॉन्सर्टसाठी ली संग युनला आमंत्रित करण्यात आले होते.

इंग्लंड आणि होनम यांच्यातील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे निमित्त साधून ती गिमचेन कल्चर अँड आर्ट सेंटरच्या ग्रँड हॉलमध्ये कार्मिना बुराना सादर करणार होती. पोलिस सध्या तिच्या मृत्यूचे कारण शोधत आहेत, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत माहिती लोकांसमोर आलेली नाही.

ली संग युनने तिचे हायस्कूल शिक्षण सोल आर्ट्स हायस्कूलमध्ये पूर्ण केले आणि सोल नॅशनल युनिव्हर्सिटीच्या कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये पुढील शिक्षण घेतले. तिची प्रतिभा आणि कौशल्यामुळे तिला न्यूयॉर्कमधील मॅनेस कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये ऍडमिशन मिळाले. तिथे पदव्युत्तर पदवी संपादन केली. (Singer)

ली संगने मॅनहॅटन कॉलेज ऑफ म्युझिक आणि मॅनेस कॉलेज ऑफ म्युझिकमधून विविध संगीत अभ्यासक्रम पूर्ण केले. ली संगने अनेक स्पर्धा जिंकल्या आणि अनेक पुरस्कार प्राप्त केले ज्यामुळे तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ऑपेरा संगीतामध्ये मुख्य स्थान प्राप्त झाले .

नॅशनल ऑपेरा स्पर्धा (दक्षिण कोरिया), न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन ऑपेरा स्पर्धा, कनेक्टिकट ऑपेरा स्पर्धा आणि ओल्गा कौसेवित्स्की स्पर्धा या काही स्पर्धांमध्ये तिने भाग घेतला आणि जिंकली देखील. (Award)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT