Rumours Of Konkona Sen Sharma Dating Amol Parashar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Konkona Sen And Amol Parashar Dating Rumours : कोंकणा पुन्हा प्रेमात? ७ वर्षे लहान अभिनेत्याला करतेय डेट; त्या पोस्टमुळे चर्चांना उधाण

Konkona Sen And Amol Parashar News : कोंकणा सेन आणि रणवीर शौरीच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री पुन्हा एकदा प्रेमामध्ये पडल्याचे बोलले जात आहे. वयाने ७ वर्षे लहान असणाऱ्या अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Chetan Bodke

Rumours Of Konkona Sen Sharma Dating Amol Parashar

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयातून अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी कोंकणा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

कोंकणाने पती रणवीर शौरीसोबत २०१० मध्ये लग्न केलं होतं. पण १० वर्षांच्या संसारानंतर त्यांनी २०२० मध्ये एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता. दोघांनाही एक मुलगाही आहे, त्याचा जन्म २०११ मध्ये झाला होता. घटस्फोटानंतर पुन्हा एकदा अभिनेत्री प्रेमामध्ये पडल्याचे बोलले जात आहे. कोकणा तिच्यापेक्षा वयाने ७ वर्षे लहान असणाऱ्या अमोल पराशरला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. (Bollywood)

गेल्या अनेक दिवसांपासून ४४ वर्षीय अभिनेत्री कोंकणा सेन आणि ३७ वर्षीय अभिनेता अमोल पराशर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत होत्या. या दोघांच्याही डेटिंगवर कोंकणा सेनचा एक्स पती रणवीर शौरीने प्रतिक्रिया दिली आहे. त्याची कमेंट व्हायरल होताच कोंकणाच्या चाहत्यांमध्ये, ती आणि अमोल रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे. एका एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केलेली आहे. त्यामध्ये, अमोलच्या इन्स्टा स्टोरीमध्ये राजकीय भाष्य केले असून पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावर अभिनेत्याने आपले मत व्यक्त केलेले पाहायला मिळत आहे. (Bollywood News)

स्क्रिनशॉट शेअर करताना एक्स पोस्टवर कॅप्शन दिले की, 'कोंकणा सेन शर्माने मोदी भक्त रणवीर शौरीला सोडून धर्मनिरपेक्ष अमोल पराशरला डेट करण्याचा सर्वोत्तम निर्णय घेतला.' आणि त्यावर रणवीर शौरीनेही उत्तर दिले आहे. रिट्वीट करत रणवीर शौरीने, 'मी यासोबत सहमत आहे.' अशी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याच्या या कमेंटमुळे कोंकणा आणि अमोलच्या डेटिंगची चर्चा होत आहे. या ट्विटमुळे सोशल मीडियावर दोघांच्याही डेटिंगबद्दल चर्चेला उधाण आले आहे. (Social Media)

खरंतर, कोंकणा आणि अमोलने ‘डॉली किट्टी और वो चमकते सितारे’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. या चित्रपटापासूनच दोघांच्याही अफेअरच्या चर्चा होत आहे. जरीही सोशल मीडियावर दोघांच्याही रिलेशनची चर्चा होत असली, तरीही दोघांनीही यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाप्पा पावलाच म्हणावं लागेल...! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी; लोणेरे पूल वाहतुकीसाठी खुला

Maharashtra Live News Update: अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा जागीच ठार

Disha Patani: 'रेड चिली' दिशा पटानीचा हॉट लूक

Pune News:पुण्यातील वाहतूक कोंडी काही सुटेना; नागरीक त्रस्त, प्रशासन मात्र सुस्त|VIDEO

Shaniwar Wada: पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्याचा रंजक इतिहास आणि मनोरंजक गोष्टी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT