Ankita Walawalkar  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

Ankita Walawalkar-Bigg Boss 19 Wild Card Entry : अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तिने आपल्या 'बिग बॉस 19' मधील वाइल्ड कार्ड एन्ट्री विषयी सांगितेले आहे.

Shreya Maskar

अंकिता वालावलकरला कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखले जाते.

अंकिता वालावलकरची 'बिग बॉस 19' मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

अंकिताने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून 'बिग बॉस' मधील आपल्या एन्ट्रीची माहिती दिली आहे.

कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे. अंकिता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिला 'बिग बॉस मराठी'मुळे खूप लोकप्रियता मिळाली आहे. तिने 'बिग बॉस मराठी'चे पाचवे पर्व खूप गाजवले आहे. आता मात्र अंकिता वालावलकर तोच धुमाकूळ घालण्यासाठी 'बिग बॉस 19'मध्ये (Bigg Boss 19) झळकणार असल्याची माहिती तिने व्हिडीओ शेअर करून दिली आहे.

सलमान खानच्या 'बिग बॉस 19'ला सुरू होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. अंकिता वालावलकर बिग बॉसच्या दुसऱ्या आठवड्यात घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहे. अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणते की, "नमस्कार मंडळी, जसे की तुम्हाला माहित आहे,'बिग बॉस' हिंदीच्या घरात माझी वाइल्ड कार्ड एन्ट्री होत आहे. मी यासाठी खूपच उत्सुक आहे. 'बिग बॉस मराठी'च्या वेळी मी 'बिग बॉस' पाहिला नव्हता. पण यावेळी माझ्या पाठीशी अनुभव आहे."

पुढे अंकिता म्हणते की, "'बिग बॉस मराठी'च्या घरात असताना तुम्ही मला जे प्रेम दिले, आशीर्वाद दिलेत. ते आताही माझ्याबरोबर राहू द्या. तुमचे हेच प्रेम आणि आशीर्वाद मला ट्रॉफीपर्यंत…" अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओत एक ट्विस्ट आला आहे. अंकिताचे बोलणे पूर्ण होतय तेवढ्यात कुणाल आणि अंकिताची बहिण तिथे येते.

कुणाल अंकिताच्या थोबाडीत मारून तिला झोपेतून उठवतो. म्हणजे अंकिताने चाहत्यांसोबत प्रँक केला आहे. ती 'बिग बॉस 19' मधील एन्ट्रीचे स्वप्न पाहत होती. अंकिताच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून मजेशीर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. अंकिता वालावलकरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT