Janhvi Kapoor In Koffee With Karan Season 8 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Janhvi Kapoor: 'मी तुझे ब्युटी स्पॉट...', जान्हवी कपूरला बॉलिवूड अभिनेत्याकडून आला होता फ्लर्टी मेसेज

Janhvi Kapoor In Koffee With Karan Season 8: या शोमध्ये जान्हवी आणि खुशी यांनी आपल्या पर्सनल लाइफशीसंबंधित अनेक खुलासे केले आहेत. दोघींनी देखील त्यांची लव्हलाइफ, फॅमिलीबद्दल खुलेपणाने सांगितले.

Priya More

Koffee With Karan 8 New Promo:

बॉलिवूडची (Bollywoood) प्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि तिची बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) यांनी नुकताच करण जोहरचा प्रसिद्ध रियालिटी शो 'कॉफी विथ करण 8'मध्ये (Koffee With Karan 8) हजेरी लावली. नेहमीप्रमाणे जान्हवी आणि खुशीची मुलाखत खूपच मजेदार ठरली. या शोमध्ये जान्हवी आणि खुशी यांनी आपल्या पर्सनल लाइफशीसंबंधित अनेक खुलासे केले आहेत. दोघींनी देखील त्यांची लव्हलाइफ, फॅमिलीबद्दल खुलेपणाने सांगितले.

करण जोहरने जान्हवी कपूर आणि खुशी कपूरला रॅपिड-फायर सेगमेंटमध्ये काही प्रश्न विचारले. यामध्ये करणने जान्हवीला तिला आलेल्या फ्लर्टी मॅसेजबद्दल विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना जान्हवी खुशीकडे पाहते आणि म्हणते की तू मला मारशील. त्यानंतर जान्हवी सांगितले की, 'मी तुझे ब्युटी स्पॉट पाहू शकतो का?' असा फ्लर्टी मॅसेज आला होता. जान्हवीने या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर करण हसतो आणि तिला विचारतो की, 'तुझ्याकडे किती ब्युटी स्पॉट्स आहेत.' त्यावर जान्हवी देखील मजेशीर उत्तर देते की, 'खूप.' महत्वाचे म्हणजे, जान्हवी कपूरला ब्युटी स्पॉट्सबद्दलचा मॅसेज एका बॉलिवूड अभिनेत्याकडून आला होता.

या शोमध्ये जान्हवी कपूर आणि खुशी कपूर त्यांची आई अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आठवणीमुळे खूपच इमोशनल झाल्या. जान्हवी आणि खुशीला आईच्या मृत्यूमुळे खूपच मोठा धक्का बसला होता. त्यांनी सांगितले की, आईच्या मृत्यूनंतर आमच्या आयुष्यामध्ये खूप काही बदल झाला आहे. यावेळी दोघींनी देखील आईच्या आठवणींना उजाळा देत त्याकाळात त्यांनी एकमेकींना कसं सावरलं हे सांगितले.

त्या कठीण काळात खुशीने संपूर्ण कुटुंबाची कशी काळजी घेतली हे देखील जान्हवी कपूरने सांगितले. 'आमच्या कुटुंबासाठी तो काळ सर्वात कठीण होता. त्यावेळी खुशीने मोठ्या हिमतीने आम्हाला सावरले होते.' आई श्रीदेवीच्या निधनाबद्दल बोलताना जान्हवीने सांगितले की, 'मला आठवते की जेव्हा कॉल आला तेव्हा मी माझ्या खोलीत होते. मला खुशीच्या खोलीतून रडण्याचा आवाज येत होता. मी रडत रडत तिच्या खोलीत गेली. पण खुशीने माझ्याकडे बघताच ती रडायची थांबली. ही गोष्ट मी कधीच विसरू शकत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT