Neetu Kapoor On Jaya Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Neetu Kapoor On Jaya Bachchan: 'कॅमेरा पाहून ती नाटक करते...', जया बच्चन यांच्यावर नीतू कपूर यांचा गंभीर आरोप

Jaya Bachchan Angry On Paparazzi: जेव्हा-जेव्हा पापाराझी जया बच्चन यांचे फोटो काढायला जातात त्यावेळी त्या चिडलेल्याच आपल्याला पाहायला मिळाले आहे. पापाराझींवर चिडतानाचे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत.

Priya More

Koffee With Karan 8:

बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटीचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या सेलिब्रिटींना पापाराझी आपल्या कॅमेऱ्यामध्ये नेहमी कैद करत असतात. हे सेलिब्रिटी देखील अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर हसताना आणि पोज देताना दिसतात. पण काही सेलिब्रिटी असे आहेत ज्यांना फोटो काढायला अजिबात आवडत नाही आणि ते पापाराझींवर चिडताना दिसतात. या सेलिब्रिटीपैकी एक म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन (Jaya Bachchan).

जेव्हा-जेव्हा पापाराझी त्यांचे फोटो काढायला जातात त्यावेळी त्या चिडलेल्याच आपल्याला पाहायला मिळाले आहे. पापाराझींवर चिडतानाचे त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले आहेत. जया बच्चन पापाराझींसोबत ज्यापद्धतीने वागतात त्यावर आता बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी मोठं वक्तव्य केले आहे.

करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या लोकप्रिय चॅट शोचा आठवा सीझन खूपच जबरदस्त ठरत आहे. 'कॉफी विथ करण'च्या 12 व्या एपिसोडमध्ये अभिनेत्री झीनत अमान आणि नीतू कपूर यांनी हजेरी लावली. यावेळी करणशी बोलताना नीतू कपूर यांनी जया बच्चन यांच्याबाबत वक्तव्य केले. नीतू यांना वाटते की जया बच्चन यांचे हे सर्व नाटक आहे आणि त्या हे मुद्दाम करतात. इतकेच नाही तर नीतू यांनी असेही सांगितले की, 'जया बच्चन आणि पापाराझी यांच्यात संगनमत असल्याचे वाटते.'

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये नीतू कपूर या जया बच्चन यांच्या पापाराझींसोबतच्या वागण्यावर उघडपणे बोलल्या आहेत. जया बच्चन अनेकदा पापाराझींवर रागावताना दिसतात. कॅमेऱ्यांसमोरच्या या अशा वागण्यामुळे जया बच्चन या रागावल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र नीतू यांनी जया बच्चन यांच्या या वागण्याला खोटे म्हटले आहे. नीतू यांनी सांगितले की, 'मला वाटते की ती हे मुद्दाम करते. मला असं वाटतं की जयाजीने असं केलं तर ते एकदाच झालं… ती तशी नाही.'

यावर करण जोहर म्हणतो की, 'अजिबात नाही, त्या खूप प्रेमळ आहेत. पापाराझी त्यांना घाबरतात. त्या एन्ट्री करताता आणि म्हणताता बस झालं. मला वाटतं आता तेही एन्जॉय करतात.' यावर नीतू पुढे म्हणाल्या की, 'प्रत्येकजण एन्जॉय करतो. काही संगनमत आहे असे मला वाटते.' दरम्यान, जया बच्चन नुकताच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंगच्या आईच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या चित्रपटात जया बच्चन यांनी रागावणाऱ्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतरही जया बच्चन यांच्या रागावलेल्या व्यक्तिरेखेबद्दल अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT