Lokshahi Movie: राजकारणाच्या सारीपाटावर खेळून जाणार एक नवी खेळी…, 'लोकशाही'चे शीर्षक पोस्टर लाँच

Lokshahi Movie Title Poster Out: अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘लोकशाही’ या मराठी चित्रपटाचा अनोखा गतिशील शीर्षक पोस्टर नुकताच लाँच करण्यात आला. हे शीर्षक पोस्टर सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Lokshahi Movie
Lokshahi MovieSaam Tv

Lokshahi Movie Poster:

मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) नवनवीन धाटणीचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी भेटीला येत आहेत. या वर्षामध्ये देखील अनेक चांगला कंटेट असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत तर काही चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. अशामध्ये आणखी एक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकताच लाँच करण्यात आले. या चित्रपटाचे नाव 'लोकशाही' (Lokshahi Movie) आहे.

शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सर्वांनीच शिकलेली एक महत्वपूर्ण ओळ म्हणजे 'लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी' चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही!’ याच आशयाची ओळ असलेला आणि गूढ आकर्षण निर्माण करणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘लोकशाही’ या मराठी चित्रपटाचा अनोखा गतिशील शीर्षक पोस्टर नुकताच लाँच करण्यात आला. हे शीर्षक पोस्टर सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

लोकशाही चित्रपटाची निर्मिती सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली आहे. तर संजय अमर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या चित्रपटाच्या दृकश्राव्य शीर्षकाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. पोस्टरमध्ये उंच इमारती आणि त्यांना लागूनच असणारे झोपडपट्टी दिसत आहेत.

पांढरपेशी भांडवलदारांनी तयार केलेलं स्वत:चं आलिशान शिखर आणि भांडवलदारांच्या भागीदारीत तेवढ्याच हिस्याचे पात्र असणारे झोपडपट्टीत राहणाऱ्या वंचित लोकांचे कदाचित ते प्रतीक असल्याचे दिसत आहे. तसेच लालभडक धुकट वातावरण आणि चित्रपटाचे नाव, एकूणच चित्रपट राजकारणाशी संबंधित संघर्षाला चिन्हांकित करत असल्याचे दिसून येत आहे.

पोस्टरमध्ये एकामागोमाग येणारे शीर्षकाचे शब्द आणि शब्दांना साथ देत गूढ आणि उस्फूर्त करणारं पार्श्वसंगीत चित्रपटाबद्दल कमालीचं आकर्षण निर्माण करत आहे. या चित्रपटामध्ये कोण-कोणते कलाकार मुख्य भूमिकेत आहेत त्यांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे याची तारीख देखील अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

Lokshahi Movie
Jaya Prada: भाजपच्या माजी खासदार जया प्रदा आहेत कुठे?, रामपूर कोर्टाने पुन्हा जारी केलं अजामीनपात्र वॉरंट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com