Tumbbad SAAM TV
मनोरंजन बातम्या

हस्तरच्या Tumbbad चं शूटिंग महाराष्ट्रात; रहस्यमयी ठिकाणाचा भितीदायक व्हिडीओ पाहिलात?

Tumbbad Film Shooting Locations : पुन्हा एकदा 'तुंबाड' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तुंबाड या हॉरर चित्रपटाचे शूटिंग कुठे झाले आहे, हे जाणून घ्या.

Shreya Maskar

तुंबाड (Tumbbad ) हा हॉरर चित्रपट काल म्हणजे 13 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला. याआधी हा चित्रपट 2018मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर हा री-रिलीज करण्यात आला. म्हणजेच प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा आला आहे. सिनेमा पाहाण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरबाहेर रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या.

तुंबाड हा भय चित्रपट पाहून लोकांच्या अंगावर काटा येतो. एकही क्षण न चुकवता हा चित्रपट पाहण्यात वेगळीच मज्जा आहे. तुंबाड हा रहस्यमय चित्रपट आहे. चित्रपटाच्या लोकेशनमुळे सिनेमाला चार चाँद लागले आहेत. rasta_homestay_sakleshpura या इंस्टाग्राम पेजने तुंबाड गावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे शूटिंग एका रहस्यमय जागेत करण्यात आले आहे.

तुंबाड या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रातील खऱ्या तुंबाड गावात झाले आहे. पुण्यापासून जवळ हे गाव आहे. या गावात अनेक ठिकाणी खजिना असल्याचे येथील स्थानिक लोकांनी सांगितले आहे. पण या खजिन्याचा पत्ता कोणालच माहित नाही. या गावी गेल्या 100 वर्षांपासून कोणीही शूटिंग केल नव्हते. चित्रपटातील एक सीन कायम त्या गावात होत असतो. तो म्हणजे मुसळधार पाऊस पडणे. तुंबाड गावात विशेषता रात्री मुसळधार पाऊस पडतो.

चित्रपटात दाखवलेला बंगला हा सिनेमाच्या केंद्रस्थानी आहे. हा बंगला पालघर जिल्ह्यात येतो. येथे फिरण्याची परवानगी घ्यावी लागते. हा बंगला 1703 मध्ये सरदार अंबाजी पुरंदरे यांच्यासाठी बंगला बांधण्यात आला. या बंगल्यात गणपती मंदिर देखील आहे. सासवड, महाबळेश्वर मध्ये तुंबाड चित्रपटाचे इतर शूटिंग करण्यात आले आहे. कोकण रेल्वेच्या साहाय्याने तुम्ही तुंबड या गावाला पोहचू शकता. अंजनी स्टेशन हे गाव जवळ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT