Kiran Rao Opens Up About Her Divorce From Aamir Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Rao And Aamir Khan : "घटस्फोटानंतर मी खूप खूश आहे कारण..." विभक्त झाल्यानंतर ३ वर्षांनी असं का म्हणाली आमिर खानची दुसरी पत्नी?

Kiran Rao Opens Up About Her Divorce From Aamir Khan : किरण रावने घटस्फोट घेतल्यानंतर ३ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. तिने बोलताना आनंद व्यक्त केला आहे.

Chetan Bodke

अभिनेता आमिर खान आणि दिग्दर्शिका किरण राव यांचा तीन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला. १६ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर त्यांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. किरण- आमिरच्या घटस्फोटाचे वृत्त ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला. जरीही त्यांचा घटस्फोट झाला असला तरीही ते दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. आयरा खानच्या लग्नावेळीही दोघे एकत्र स्पॉट झाले होते. त्या शिवाय 'लापता लेडीज'च्या प्रमोशनवेळीही दोघे एकत्र स्पॉट झाले होते. किरण रावने घटस्फोट घेतल्यानंतर ३ वर्षांनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतंच किरण रावने पत्रकार फे डिसुझाच्या एका इव्हेंटमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी तिने खासगी आयुष्याबद्दलही अनेक महत्वाचे खुलासे केले आहेत. मुलाखतीमध्ये किरणने सांगितले की, "मला असं वाटतं की, काही वेळानंतर तुम्हाला तुमच्या नात्याची नव्याने व्याख्या करण्याची गरज असते. कारण की, आपण जस-जसे मोठे होत जातो, तस- तसं आपल्यात एक व्यक्ती म्हणून अनेक बदल होत असतात. आपल्याला वेग-वेगळ्या गोष्टींची गरज भासू लागते. घटस्फोटानंतर मी अधिक आनंदी आहे, मला असं वाटतं. याला तुम्ही एक आनंदी घटस्फोट देखील म्हणू शकता…"

किरण रावने पुढे मुलाखतीमध्ये सांगितलं की, "मी लग्नाच्या आधी फार दिवस एकटीच राहत होती. मी लग्नाच्या आधी माझ्या आयुष्याचा आणि स्वातंत्र्याचा पूर्ण आनंद घेतला आहे. तेव्हा मला अनेकदा एकटेपणा वाटायचा, पण आता मी मुलगा आझादसोबत राहते. मी त्याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. मला असं वाटतं की, अनेकांना घटस्फोटानंतर आयुष्यात एकटं पडल्यासारखं वाटतं, पण मला असं केव्हाच वाटलं नाही."

"कारण, मला नेहमीच आमिर आणि माझ्या कुटुंबाकडून पूर्णपणे पाठिंबा मिळाला आहे. शिवाय, त्यांनी मला केव्हाच एकटं पडू दिलं नाही. आम्हाला घटस्फोट घेण्यासाठी फक्त एका कागदाची (घटस्फोटाचा अर्ज) गरज होती. पण आम्हाला माहिती होतं की, आम्ही एकमेकांसाठी किती महत्त्वाचे आहोत.. ही गोष्ट आम्हाला माहिती होती." असं किरण राव मुलाखतीमध्ये म्हणाली आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: पुण्यातील दगडूशेठ गणपती मिरवणुकीच्या रथाला आकर्षक रोषणाई

Deepa Parab: मन झालं बाजिंद, ललकारी ग...

GK: डावखुऱ्या लोकांचा मेंदू जास्त ॲक्टिव्ह का मानला जातो? जाणून घ्या कारणे

SCROLL FOR NEXT