Kiran Mane New Television Serial Instagram
मनोरंजन बातम्या

Kiran Mane New Serial: किरण माने बिग बॉसनंतर झळकणार नव्या मालिकेत, पोस्ट शेअर करत दिली महत्वाची अपडेट...

बिग बॉसनंतर किरण माने लवकरच येत्या दिवसात दुसऱ्या मालिकेत झळकणार आहे.

Chetan Bodke

Kiran Mane New Television Serial: बिग बॉस मराठी फेम किरण माने नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. नाटक, मालिका आणि चित्रपटातून आपली ओळख निर्माण करून त्याने आपली प्रतिमा चाहत्यांमध्ये निर्माण केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी किरण मानेने त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणावर मुस्लिम समाजाला होणाऱ्या विरोधावरुन सडकून टीका केली. आता त्या नंतर किरण मानेने नवीन पोस्ट करून नवीन मालिकेविषयी संकेत दिलाय.

स्टार प्रवाह वरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमुळे किरण माने कमालीचा चर्चेत होता. आता त्या मालिकेनंतर किरण माने लवकरच येत्या दिवसात दुसऱ्या मालिकेत झळकणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत मालिकेच्या सेटवरील काही फोटो शेअर केले.

त्यात किरण माने म्हणतो, “नविन मालिका, नवी भुमिका... सहसा माझ्या वयाच्या पुरूष कलावंतांना मालिकांमध्ये फारसं काही वेगळं करायला मिळत नाही. मालिका या हिराॅईनभोवती फिरणार्‍या असतात. अशा परिस्थितीतही मला आश्चर्यकारकरित्या लक्षवेधी कॅरॅक्टर्स साकारायला मिळाली, जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.”

तर पुढे किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “ ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधला राधिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहाणारा भाऊ शिरीषदादा... ‘मुलगी झाली हो’ मधला तुफान गाजलेला रांगडा, हळवा, ‘ॲंग्री यंग मॅन’ विलास पाटील... हे परस्परविरोधी धाटणीचे दमदार रोल्स करायला मिळणं हे माझ्यामधल्या अभिनेत्याला सुखावणारं होतं. विशेष म्हणजे दोन्ही मालिकांनी टी.आर.पी. चे रेकाॅर्डब्रेक उच्चांक गाठले होते !”

किरण माने त्याच्या पोस्टमध्ये शेवची लिहीतो, “आता मी छोट्या पडद्यावर आत्तापर्यंत साकारलेल्या भुमिकांपेक्षा खूप वेगळा माणूस साकारतोय. तुम्ही याआधी मला अशा रोलमध्ये कधी इमॅजिनही केलं नसेल! शुटिंगला नुकतीच सुरूवात झालीय. खूप मजा येतीये. कुठल्या वाहिनीवर,कधीपासून आणि किती वाजता याबद्दल लवकरच कळवेन... तोपर्यन्त Stay Tunned !”

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या सीझनमध्ये सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध झालेला किरण माने कमालीचा चर्चेत आहे. नेहमीच किरण माने सोशल मीडियावर चर्चेत असतो. मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली सोशल मीडियाच्या माध्यमातून तो प्रतिक्रिया देतो. जे खटकेल त्यावर निर्भीडपणे टीका करणारा आणि पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण माने अशी त्यांची ओळख आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT