Nitesh Pandey Passed Away: ‘अनुपमा’ फेम अभिनेते नितेश पांडेचे निधन, वयाच्या ५१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...

‘अनुपमा’ फेम नितीश पांडे यांचे काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
Nitesh Pandey Dies
Nitesh Pandey DiesSaam Tv

Nitesh Pandey Dies: ‘अनुपमा’ फेम नितीश पांडे यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. ‘अनुपमा’ या प्रसिद्ध टेलिव्हिजन सीरियलमध्ये रुपाली गांगुलीची मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारून ते घराघरात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. ५१ वर्षीय अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

Nitesh Pandey Dies
Kiran Mane New Serial: किरण माने बिग बॉसनंतर झळकणार नव्या मालिकेत, पोस्ट शेअर करत दिली महत्वाची अपडेट...

लेखक सिद्धार्थ नागर यांनी अभिनेत्याच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला असून त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत माहिती दिली आहे. वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सिद्धार्थ नागर यांनी सांगितले की, नितीश कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना त्यांना नितीश पांडे यांच्या निधनाची बातमी कळाली, नितीश शूटिंगसाठी इगतपुरीला गेले होते. तेथे रात्री दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरात असलेल्या एका हॉटेल मध्ये मुक्कामाला थांबलेला अभिनेता नितेश पांडे यांचा हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले. इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये ते कामानिमित्त थांबले होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या रूममध्ये हॉटेल स्टॉप ने फोन केले असता अभिनेत्याने फोन उचलले नाही. सदर व्यक्ती काही कामात असेल म्हणून वेटरने पुन्हा रात्रीच्या सुमारास रूमच्या फोनवर फोन केला व त्यांच्या खाजगी मोबाईलवर फोन केला नितेश पांडे यांनी फोन व मोबाईल उचलला नाही. (Bollywood Actor)

Nitesh Pandey Dies
TMKOC Producer In Trouble: असित मोदीच्या अडचणीत आणखी वाढ, मोनिका भदोरियाने केला सेटवरील किस्सा शेअर...

हॉटेल कर्मचाऱ्याला संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी ही घटना लगेचच हॉटेल मॅनेजरला कळवले... हॉटेल मॅनेजर यांनी दुसऱ्या चावीने रूमचा दरवाजा उघडताच नितेश पांडे हे त्यांच्या बेडवर बेशुद्ध अवस्थेत आढळले... लगेचच त्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात रात्रीच्या सुमारास दाखल करण्यात आले. परंतु इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.. (Serial)

अभिनेत्याच्या अचानक एक्झिटने टेलिव्हिजन सीरियल इंडस्ट्री व फिल्म इंडस्ट्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नितेश पांडे यांचे वय ५१ असून इगतपुरी परिसरात ते स्टोरी रायटिंगसाठी अनेकदा आल्याची माहिती मिळाली. मंगळवारी रात्री निधन झाल्याची प्राथमिक माहिती इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी दिली आहे. सध्या पुढील तपास इगतपुरीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्यांचे कर्मचारी करीत आहे.

Nitesh Pandey Dies
Vaibhavi Upadhyay Last Post: वैभवी उपाध्यायची अखेरची पोस्ट व्हायरल, निधनाच्या सोळा दिवसांआधी म्हणाली...

नितीश पांडे यांचा जन्म १७ जानेवारी १९७३ रोजी झाला. आपल्या सिनेकारकिर्दित नितेश पांडे यांनी अनेक हिंदी चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. 'ओम शांती ओम' या चित्रपटातही अभिनेत्याने शाहरुख खानच्या असिस्टंटची भूमिका साकारली होती.

सोबतच 'बधाई दो', 'रंगून', 'हंटर', 'दबंग 2', 'बाजी', 'मेरे यार की शादी है', 'मदारी' आणि 'खोसा का घोसला' यांसारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आपले स्थान निर्माण केले. त्याबरोबरच ते दिशा परमार आणि नकुल मेहता स्टारर शो 'प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यार' मध्ये देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com