Kiran Mane: बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांमध्ये आपापसात वाद होत असतात. कधी कोण आपल्या वक्तव्यांनी तर कोण आपल्या फॅशनमुळे बिग बॉसच्या घरात प्रसिद्ध आहे. त्यातील एक सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक म्हणजे किरण माने. किरण मानेचे पहिल्या दिवसापासूनच घरातील काही स्पर्धकांसोबत अनेकदा वादाचे खटके उडाले आहेत.
किरण मानेचे घराबाहेरील अनेक वाद कदाचित तुम्हाला ठाऊक असतील. हा चेहरा बिग बॉसच्या घरात आला आणि अनेक चित्र पालटले.
किरणची वागणुक घरातल्या सदस्यांना पटत नसल्याने त्याला सगळेच नॉमिनेट करायचे. बिग बॉसच्या घरात किरण माने राहणार की नाही असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना काही काळ पडला होता.
इव्हिक्शन रुममध्ये जवळपास तीन दिवस राहत पुन्हा एकदा घरात येत आपल्या खेळाला नवे रुप दिले. जवळपास ९३ दिवस बिग बॉसच्या घरात राहून त्याने शेवटचा टप्पा गाठला. त्याचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता, अनेक गोष्टींचा सामना करत त्याने बिग बॉसच्या घरात टॉप स्पर्धकांमध्ये आपले स्थान निर्माण केले.
विकास आणि त्याच्या मैत्रीवरूनही अनेकदा वाद झाले होते. त्यामुळे दोघांनीही एकमेकांची साथ सोडली होती. पण सातारचा पठ्ठ्या काही दमला नाही. अधिक जिद्दीने, चिकाटीने खेळून शेवटच्या आठवड्यात आला आणि टॉप ६ खेळाडूंमध्ये त्याचे नाव जाहीर झाले.
या शेवटच्या आठवड्यात बिग बॉस सहाही स्पर्धकांचा आजवरचा प्रवास दाखवत आहेत. त्यांचे अभिनंदन करत आहेत. यासाठी बिग बॉसच्या घरातच एक खास सेट उभारण्यात आला आहे, जिथे तो स्पर्धक येताच रोषणाई होते, फटाके फुटतात आणि त्याचे जंगी स्वागत होते. असेच स्वागत काल किरण मानेचे झाले.
यावेळी बिग बॉसने साताऱ्याचा बच्चन अशी किरण मानेची ओळख सांगितली. तेव्हा किरण माने प्रचंड भावूक झाला. 'भाग गेला क्षिण गेला.. अवघा झाला आनंद' अशा अभंगाच्या ओळीतून त्याने आजवरचा त्याचा प्रवास उलगडला.
शिवाय मला ऑस्कर जरी मिळाला तरी मी त्या स्टेजवरुनही हेच सांगेन की 'बिग बॉस'माझे गॉड फादर आहेत. म्हणताना तो प्रचंड रडला. असा किरण माने पहिल्यांदाच सर्वांनी पाहिला. पण सर्वच स्पर्धक तोडीस तोड असल्याने आता ट्रॉफी नक्की कुणाकडे जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.