Anant Ambani Radhika Merchant Wedding In Hollywood Celebrity Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत- राधिकाच्या लग्नात हॉलिवूड स्टार लावणार चार चाँद, कार्दशियनी, प्रियंका- निक जोनास लावणार हजेरी

Anant- Radhika Wedding In Hollywood Celebrity : अखेर आज तो दिवस उजाडला. आज अनंत अंबानी- राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी देशासह परदेशातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थिती लावणार आहेत.

Chetan Bodke

अखेर आज तो दिवस उजाडला. आज अनंत अंबानी- राधिका मर्चंट लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईतल्या बीकेसीमधील जियो वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. राज्यातील प्रमुख नेते मंडळीही उपस्थिती लावणार आहेत, त्यासोबतच काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही लग्नाला उपस्थिती लावणार आहे. याशिवाय लग्नसोहळ्यासाठी देशासह परदेशातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थिती लावणार आहेत. देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि कार्दशियन बहिणींमधून दोन बहिणीही मुंबईत लग्नासाठी पोहोचल्या आहेत. जिथे दोघे मुंबईतील कलिना एअरपोर्टवर स्पॉट झाले.

कार्दशियन बहिणी दोघीही पहिल्यांदाच भारतात आल्या आहेत. किम कार्दशियन आणि क्लो कार्दशियन भारतात पहिल्यांदाच अनंत-राधिकाच्या लग्नासाठी आल्या आहेत. दोघीही पेशाने अमेरिकन मॉडेल आहेत. त्या नेहमीच आपल्या सौंदर्यामुळे जगभरामध्ये चर्चेत असतात. कार्दशियन बहिणींना भेटण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उत्साहित आहे. मिडिया रिपोर्टनुसार, दोघीही खास लग्नासाठी सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर तरूण तहलियानी यांनी डिझाईन केलेला आऊटफिट वेअर करणार आहेत.

याशिवाय, अनंत-राधिकाच्या लग्नासाठी प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनासही उपस्थिती लावणार आहे. प्रियंका चोप्राचं आणि अंबानी कुटुंबीयांचं बाँडिग फार खास आहे. अनेक अंबानी कुटुंबीयांच्या इव्हेंटसाठी प्रियंका चोप्राने उपस्थिती लावली आहे. सध्या सोशल मीडियावर यांनी मुंबई विमानतळावर उपस्थिती लावल्यानंतरचे अनेक फोटो व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. याशिवाय अनंत- राधिकाच्या लग्नासाठी युकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि युएसचे सेक्रेटरी टॉनी ब्लेयरही लग्नाला उपस्थिती लावणार आहे.

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा १२ जुलै अर्थात आज शुभ मुहूर्तावर ठीक दुपारी ३ वाजता मुंबईमध्ये पार पडणार आहे. तर, १३ जुलैला संध्याकाळी आशीर्वाद समारंभ पार पडेल. या समारंभाला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. तर, १४ जुलैला रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लग्नाच्या ह्या तिनही दिवसांच्या कार्यक्रमांसाठी अंबानी कुटुंबीयांनी खास ड्रेस कोड ठेवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT