Kili Paul and Neema Paul Viral Video Instagram
मनोरंजन बातम्या

Kili Paul and Neema Paul Viral Video: सातासमुद्रापार बहरला 'मधुमास नवा', किली आणि नीमाच्या सुंदर डान्सने जिंकलं चाहत्यांचं मन, पाहा व्हिडीओ

तांजानियाच्या किली पॉल आणि त्याच्या बहिणीला सुद्धा महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील ‘बहरला मधुमास नवा’ गाण्याची भुरळ पडली आहे.

Chetan Bodke

Kili Paul and Neema Paul Viral Video: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची सध्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या टीझरने आणि ट्रेलरने सर्वांचीच उत्सुकता कमालीची ताणून धरली आहे. हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सध्या चित्रपटातील गाणे देखील सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. चित्रपटातील सर्वात पहिलं गाणं ‘बहरला मधुमास नवा’ हे गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर अनेकांना रिल्स बनवण्याचा मोह आवरत नाहीये. अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच मंडळी या गाण्यावर रिल्स बनवत आहे.

सध्या हे गाणं सोशल मीडियावर कमालीचं ट्रेंडमध्ये असून सना शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. गाण्यात आली उमलून माझ्या गाली या ओळींवर सनाने सुंदर हुक स्टेप करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. ही हुक स्टेप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून तांजानियाच्या किली पॉल आणि त्याच्या बहिणीला देखील गाण्याची भुरळ पडली आहे. नुकतंच त्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून चांगलंच व्हायरल होत आहे.

तांजानियाच्या किली पॉल आणि त्याच्या बहिणीला देखील या गाण्यावर व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरलेला नाही. त्या गाण्यावर दोघेही बहिण- भावांनी सना शिंदेसारख्या हूक स्टेप करत प्रेक्षकांचे मन जिंकले. किली आणि नीमाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अंकुश चौधरी, सना शिंदे, केदार शिंदे यांनी हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सने कमेंटच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त केले आहे.

युजर्स म्हणतात, ‘मस्त डान्स केला नीमा ताई आणि किली भाऊ’, ‘भाऊ तू मराठी प्रेक्षकांना खूश केल्याबद्दल तुला प्रेमाचा जय महाराष्ट्र’ अशा कमेंट्स मराठी युजर्सने केल्या आहेत. किली पॉल आणि नीमा या बहिण- भावाने नेहमीच आपल्या डान्सने चाहत्यांचे लक्ष वेधले. त्यांचे इन्स्टाग्रामवर ५ मिलियन फॉलोअर्स आहेत. मध्यंतरी किली पॉलला भारतात आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्याने माधुरी दिक्षित, नोरा फतेही अशा अनेक सेलिब्रिटींसह डान्सचा आनंद घेतला होता.

या गाण्याला आतापर्यंत लाखोच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच इन्स्टाग्रामवरही या गाण्याच्या अनेक व्हिडीओज बऱ्याच आहेत. येत्या २८ एप्रिलला ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेता अंकुश चौधरी सिनेमात शाहीरांच्या प्रमुख भूमिकेत आहे. तर सना शिंदे शाहीरांची पत्नी भानुमती साबळे यांचे पात्र साकारणार आहे. अजय-अतुल यांचं संगीत सिनेमाला लाभलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक; मतदान प्रक्रियेला सुरुवात

Namo Shetkari Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी योजनेचे ₹२००० जमा, तुमच्या खात्यात पैसे आले का? असं करा चेक

Pitru Paksha 2025 : पितृपक्षात काय करावे आणि काय करू नये?

Crime News : पुण्यातील गँगवॉरची पनवेलमध्ये पुनरावृत्ती, गोल्डन मॅनचा राजकुमार म्हात्रेवर जीवघेणा हल्ला

Vice President Election : कुणाचा गेम होणार? मतदानाआधीच ३ पक्षाची माघार, दिल्लीत मोठ्या घडामोडी

SCROLL FOR NEXT