Sidharth Malhotra Wrist Watch Saam TV
मनोरंजन बातम्या

Sidharth Malhotra Wrist Watch: लग्नानंतर कियाराच्या मंगळसूत्राची तर सिद्धार्थच्या घड्याळाची चर्चा, किंमत पाहून डोळे चक्रावतील

Sidharth Malhotra & Kiara Advani: सिद्धार्थ मल्होत्राच्या संपूर्ण लूकसह त्याच्या मनगटावर असलेल्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधले.

Saam Tv

Sidharth Malhotra Wrist Watch Price: बॉलिवूड सेलिब्रिटी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियाराडवानी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले आहेत. सध्या सगळीकडे सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाची चर्चा आहे. बुधवारी सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी लग्नानंतर जैसलमेरहून दिल्लीला गेले.

लग्नानंतर दिल्ली विमानतळावर सिड आणि कियारा पहिल्यांदाच लोकांसमोर आले. यादरम्यान सिद्धार्थ मल्होत्राच्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या घड्याळाची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

लग्नानंतर दिल्लीला गेलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या एअरपोर्ट लूकचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी कियारा सिंदूर, हातात चुडा आणि साध्या चप्पलमध्ये दिसत होती. तर दुसरीकडे, सिद्धार्थ मल्होत्रा ​​लेदर जॅकेट, जीन्स आणि सनग्लासेसमध्ये हँडसम दिसत होता.

सिद्धार्थ मल्होत्राच्या संपूर्ण लूकसह त्याच्या मनगटावर असलेल्या घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याच घड्याळ सध्या चर्चेचा विषय बनला आणि घडाळ्याच्या किंमतीबाबतीच अनेक तर्क नेटकरी लावत आहेत. सर्वांनाच सिद्धार्थच्या या घड्याळाची किंमत जाणून घ्यायची आहे. Indian Watch Concierge ने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून सिद्धार्थ मल्होत्राच्या घड्याळाच्या किंमतीबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Indian Watch Concierge यांच्य मते, सिडचे घड्याळ हे सिल्व्हर स्टोन मॉडेलमधील आंतरराष्ट्रीय घड्याळ कंपनी ग्रॅहमचे आहे. या घड्याळाची बाजारातील किंमत 4 लाख 75 हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. तर रिटेलमध्ये सिडच्या या घड्याळाची किंमत सुमारे 4 लाख 48 हजार रुपये असल्याचा दावा केला जात आहे. सिद्धार्थ मल्होत्राने घातलेल्या या घड्याळाची किंमत जाणून तुम्हाला धक्काच बसला असेल.

लग्नानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे पहिले रिसेप्शन आज म्हणजेच ९ फेब्रुवारीला दिल्लीत पार पडणार आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार सिड आणि कियारा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये रंग भरताना दिसणार आहेत. यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाचे दुसरे रिसेप्शन १२ फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Rain Video: ठाण्यात मुसळधार पाऊस! पाण्यासोबत घरात शिरले साप | VIDEO

Maharashtra Rain Live News: कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

कोणत्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे हिरड्यांमधून रक्तस्राव होतो?

Baramati Crime News : भेटण्यासाठी बोलावत केले भयानक कृत्य; तरुणाला नग्न करून बेदम मारहाण

शहरात फिरवलं अन् हॉटेलमध्ये नेऊन शारीरिक संबंध; शिवसेनेच्या माजी आमदारावर महिलेचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT