Actress Pregnant SAAM TV
मनोरंजन बातम्या

Actress Pregnant : ३५ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार प्रसिद्ध अभिनेत्री, क्यूट फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

Kiara Advani Pregnant : बॉलिवूड कपलने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. ३५ व्या वर्षी अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे. क्यूट पोस्ट एकदा पाहाच.

Shreya Maskar

बॉलिवूडचे पावर कपल दुसऱ्यांदा होणार आई-बाबा

क्यूट फोटो शेअर करत दिली गुडन्यूज

३५ व्या वर्षी अभिनेत्री दुसऱ्या बाळाला देणार जन्म

मनोरंजन विश्वातून आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे पावर कपल दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे. बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लवकरच त्यांच्या घरात नवीन बाळाचे स्वागत होणार आहे. दोघांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

कियारा-सिद्धार्थ पोस्ट

पोस्टमध्ये एक सुंदर, हृदयस्पर्शी फोटो पाहायला मिळत आहे. ज्यात कियारा, सिद्धार्थ आणि त्यांच्या पहिल्या छोट्या लेकीचे चिमुकले हात पाहायला मिळत आहे. कियारा-सिद्धार्थची लेक सरायाह (Saraayah) पांढऱ्या रंगाचा एक छोटासा मोजा हातात धरून असल्याचे दिसते आणि सिद्धार्थ- कियाराने तिचा छोटा हात धरला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आम्हाला पुन्हा एकदा सर्वात मोठं गिफ्ट मिळालं आहे...आमची मने प्रेम आणि कृतज्ञतेने भरून गेली आहेत..."

शुभेच्छांचा वर्षाव

कियारा-सिद्धार्थने शेअर केलेल्या या गोंडस फोटोने सर्वांची मने जिंकली. या फोटोवर चाहते आणि कलाकार मंडळी शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. दोघांना नवीन आयुष्यासाठी भरभरून प्रेम आणि शुभेच्छा देत आहे. कियारा ३५ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राला जुलै 2025 मध्ये पहिले बाळ झाले. कियाराने एका गोंडस मुलीला जन्म दिला, जिचे नाव सरायाह असे आहे. आता मल्होत्रा आणि अडवाणी कुटुंब नवीन बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या नात्याची खरी सुरुवात २०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'शेरशाह' या चित्रपटामुळे झाली. फेब्रुवारी २०२३ मध्ये कियारा-सिद्धार्थचा थाटामाटात लग्न सोहळा पार पडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदींची सार्वजनिक जीवनातील २५ वर्ष पूर्ण

RBI Repo Rate: रेपो रेट वाढला, आता तुमच्या EMI वर परिणाम होणार; होम- कार अन् पर्सनल लोनमध्ये काय बदल झाला?

Garba Painjan Designs : नवरात्रीत घागरा-चोळीवर खुलून दिसतील पैंजणाच्या 'या' ७ ट्रेंडी डिझाइन्स, तुमच्यावरून कुणाची नजर हटणार नाही!

फडणवीस सरकारला हायकोर्टानं खडसावले, MPSC विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती, कोर्टात नेमकं काय झालं?

Farmer Scheme : शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी सरकारकडून गुड न्यूज! ३० लाख रुपयांपर्यंत मिळणार सबसिडी; कसा कराल अर्ज? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT