Shruti Vilas Kadam
आमिर खान प्रॉडक्शन हाऊसकडून अभिनेत्याचा 80च्या दशकातील विंटेज लूकमधील AI फोटो शेअर करण्यात आला. हा फोटो त्यांच्या सितारे जमीन पर चित्रपटाशी संबंधित असल्याचे दिसते.
आमिर खान प्रॉडक्शन हाऊसने इमरान खानचा AI फोटोही शेअर केला. हा फोटो जाने तू या जाने ना चित्रपटाच्या आठवणींशी जोडलेला असल्याचे दिसून येते.
कियारा आडवाणीने पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत 80s स्टाइलमधील फोटो शेअर केला. कियाराचा पिंक ड्रेस आणि सिद्धार्थचा डेनिम लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनीही या व्हायरल ट्रेंडमध्ये सहभाग घेतला. दोघांचे रेट्रो अंदाजातील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले.
अभिनेत्री नितांशी गोयलनेही AIच्या मदतीने 80च्या दशकातील लूक तयार केला. पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमधील तिचा हा अंदाज लक्षवेधी ठरला.
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीनेही हा ट्रेंड फॉलो केला. जीन्स आणि शर्टमधील तिचा AI फोटो पाहून ती 80च्या दशकातील कॉलेज गर्लसारखी दिसत आहे.
सोनम बाजवा, दिव्या दत्ता, अक्षरा हासन, नेहा भसीन, निमरत कौर, आरजे महवश यांच्यासह अनेक कलाकारांनी AIच्या मदतीने आपले 80s विंटेज फोटो शेअर केले आहेत.