Kiara Advani SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kiara Advani : 'मॉम टू बी' कियाराचा हटके अंदाज; बेबी बंप फ्लॉन्ट करत एन्ट्री, पाहा PHOTOS

Met Gala 2025: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने 'मेट गाला 2025' या फॅशन इव्हेंटमध्ये एका हटके स्टाइलने बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. तिने एक खास मेसेज देखील चाहत्यांना दिला आहे. तिचे सुंदर फोटो पाहा.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा बॉलिवूडचे पावर कपल आहे. अलिकडेच त्यांनी ते आई-बाबा होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. अशात कियारा अडवाणी अनेक वेळा स्पॉट झाली आहे. आता मात्र कियारा अडवाणीने आपल्या स्टाइलनं चाहत्यांना वेड लावले आहे. न्यू यॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'मेट गाला 2025' या (Met Gala 2025 ) फॅशन इव्हेंटमध्ये कियाराने आपल्या लूकने सर्वांचे मन जिंकले आहे.

कियारा अडवाणीने 'मेट गाला 2025' इव्हेंटमध्ये एका खास लूकमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे. तिच्या या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कियाराने याचे फोटो इन्स्टाग्राम देखील शेअर केले आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन देखील दिले आहे. तिने लिहिलं आहे. की, "आईचा मे महिन्यातील पहिला सोमवार..." तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.

कियाराचा लूक

अभिनेत्री कियारा अडवाणी 'मेट गाला 2025' फॅशन इव्हेंटसाठी ब्लॅक, व्हाइट आणि गोल्डन रंगाचा वेस्टन गाऊन परिधान केला आहे. मोकळे केस आणि गोल्डन ज्वेलरीने तिने हा लूक पूर्ण केला आहे. रेड कार्पेटवर तिच्या एन्ट्रीने चार चाँद लागले. कियाराच्या या ड्रेसला 'ब्रेव्हहार्ट्स' असे नाव देण्यात आले आहे. तिचा हा ड्रेस महिला शक्ती, मातृत्व आणि बदलाच्या एका नवीन टप्प्याचे प्रतीक होते. दोन प्रतीकात्मक रूपे - मदर हार्ट आणि बेबी हार्ट ड्रेसवर पाहायला मिळाले. जे एका साखळीच्या नाभीने जोडलेली आहेत. या हृदयस्पर्शी चिन्हाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कियारा अडवाणीचा हा स्टायलिश डिझायनर ड्रेस फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांनी बनवला आहे. कियाराच्या या लूकमध्ये फॅशन आणि भावना दोन्हीचा उत्तम मेळ घातलेला पाहायला मिळत आहे. जेव्हा कियाराला या खास लूकबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती भावुक होऊन म्हणाली की,"एक कलाकार आणि आई होणारी महिला म्हणून हा क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ठराव पास, तटकरेंची महत्वाची भूमिका; सूनेत्रा पवारांना कोणती मोठी जबाबदारी मिळाली?

Bombil Fry Recipe: कोकणची अस्सल चव, कुरकुरीत बोंबील फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार यांचा थोड्याच वेळात शपथविधी

Royal Enfield Classic 350: किराण्याच्या बजेटमध्ये दारी येईन Royal Enfield,जाणून घ्या EMIचे गणित

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार! २५ वर्षीय तरुणाची गळा चिरून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT