Do You Know Kiara Advani Real Name Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiara Advani Birthday: कियाराने कोणाच्या सांगण्यावरून बदललं नाव? काय आहे अभिनेत्रीचं खरं नाव? जाणून घ्या...

Do You Know Kiara Advani Real Name: कियारा अडवाणी हिचं खरं नाव कियारा नसून वेगळंच आहे. आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त तिने कोणाच्या सांगण्याने नावात बदल केला ? जाणून घेऊया...

Chetan Bodke

अभिनेत्री कियारा अडवाणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. फार कमी वेळात कियाराने इंडस्ट्रीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. कियाराचा आज (३१ जुलै) ३२वा वाढदिवस आहे. कियाराचा जन्म ३१ जुलै १९९२ रोजी मुंबईत झाला. कियारा बॉलिवूडसह टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनेत्रीचं खरं नाव कियारा नसून वेगळंच आहे. आज आपण तिच्या वाढदिवसानिमित्त तिने कोणाच्या सांगण्याने नावात बदल केला ? जाणून घेऊया...

कियाराचा जन्म एका बड्या उद्योगपतीच्या घरात झाला आहे. तिचे वडील जगदीप अडवाणी हे मोठे उद्योगपती आहेत. तर तिची आई जेनेव्हिव्ह जाफरी पेशाने शिक्षिका आहेत. फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी कियाराचं नाव आलिया अडवाणी असं होतं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासोबतच तिने स्वतःचं नाव देखील बदलले. कियाराने २०१४मध्ये ‘फगली’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. त्याचवेळी तिने तिचे नाव आलिया बदलून कियारा केले. कियाराने ज्यावेळी बॉलिवूड पदार्पण केलं त्यावेळी आलिया भट्टचं इंडस्ट्रीत मोठं नाव होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, कियाराने बॉलिवूडचा भाईजान अर्थाच सलमान खानच्या सांगण्यावरून तिच्या नावात बदल केला. नाव बदलण्याचा किस्सा कियाराने एकदा एका मुलाखतीत सांगितला होता. त्यावेळी ती म्हणाली की, "प्रियंका चोप्राचा ‘अंजाना अंजानी’ नावाचा चित्रपट होता. त्या चित्रपटामध्ये प्रियंकाच्या पात्राचं नाव कियारा असं होतं. त्यामुळे मी खूप प्रभावित झाली होती." कियाराने आजही तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचं आलिया नाव कायम ठेवलं आहे. कियाराने तिचं खरं नाव मधलं नाव म्हणून ठेवले आहे. कियाराचं इन्स्टाग्रामवर 'kiaraaliaadvani' असं नाव आहे.

कियाराने आपल्या फिल्मी करियरमध्ये, 'एम.एस.धोनी', 'लस्ट स्टोरीज', 'कबीर सिंग', 'गुड न्यूज', 'शेरशाह', 'भूल भुलैया २', 'जुगजुग्ग जियो' सह अशा अनेक चित्रपटांतून कियाराने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. कियाराला खरी ओळख ' एम. एस. धोनी' आणि 'कबीर सिंग' चित्रपटातून मिळाली आहे. कियारा लवकरच रामचरणसोबत 'गेमचेंजर' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय ती कार्तिक आर्यनसोबतही 'भूल भुलैया ३' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT