Starfish Movie Wrap UP Saam TV
मनोरंजन बातम्या

Starfish Movie Wrap Up: लवकरच रुपेरी पडद्यावर घेता येणार समुद्र सफरीचा आनंद, मिलिंद सोमण-खुशाली कुमारच्या ‘स्टारफिश’चं शूटिंग पूर्ण

Khushali Kumar Post: खुशाली कुमारने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा बीटीएस फोटो शेअर केला.

Pooja Dange

Milind Soman - Khushali Kumar Upcoming Movie:

अभिनेत्री खुशाली कुमार आणि अभिनेते मिलिंद सोमण यांचा नवीन चित्रपट 'स्टारफिश' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अखिलेश जैस्वाल दिग्दर्शित आणि भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि ऑलमाईटी मोशन पिक्चर्स निर्मित या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे.

खुशाली कुमारने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट करत शूटिंगच्या शेवटच्या दिवसाचा बीटीएस फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे प्रेक्षकांची या चित्रपटाविषयीची चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

खुशाली कुमारने चित्रपटाच्या रॅपअप फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, 'दॅट्स अ फिल्म रॅपअप! स्टारफिश - आणखी एका चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले... एका अमेझिंग आणि थरारक चित्रपटात मस्त पोहून घेतलं. अप्रतिम कास्ट.' याचसह खुशाली कुमारने चित्रपटाची रिलीज डेट देखील सांगितली आहे.

खुशाली कुमार 'स्टारफिश' या चित्रपटाविषयी आणि तिच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना म्हणाली, “हे एक पाण्याखालील जग आहे, हे एक अतिशय रोमांचक नाटक आहे. मी एवढेच सांगू शकतो की माझ्या आधीच्या चित्रपटांच्या तुलनेत ही भूमिका सर्वात आव्हानात्मक होती. कारण ही व्यक्तिरेखा साकारताना मला शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या आव्हान दिले होते. जलतरणपटू म्हणून मला माझ्या ऍथलेटिक क्षमतेनुसार सर्वोत्तम कामगिरी करावी लागली.” (Latest Entertainment News)

चाहते आता चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. खुशाली कुमार आणि तिच्या सहकलाकारांसोबत या अंडरवॉटर अॅडव्हेंचरला सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. 'स्टारफिश' पाहिल्यानंतर प्रेक्षकांना समुद्रात सूर मारून ताजेतवाने होतील असे वचन निर्माते देत आहेत. रुपेरी पडद्यावर ड्रॅामा आणि रोमांस याचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार आहे. हा चित्रपट 24 नोव्हेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

'स्टारफिश' चित्रपटात मिलिंद सोमण, खुशाली कुमारसह एहान भट्ट, तुषार खन्ना हे कलाकार देखील दिसणार आहेत. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

SCROLL FOR NEXT