Hardik Pandya And KGF Fame Yash  Instagram/ @hardikpandya93
मनोरंजन बातम्या

Hardik Pandya: रॉकी आणि हार्दिकचा फोटोपाहून चाहतेही भारावले, 'केजीएफ ३'ची केली ऑफर...

केजीएफच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून आता लवकरच तिसऱ्याही भागाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Chetan Bodke

Hardik Pandya: दाक्षिणात्य चित्रपटांनी २०२२ या वर्षात बॉलिवूड चित्रपटांना चांगलीच धुळ चारत आपला डंका वाजवला. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे केजीएफ. केजीएफच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून आता लवकरच तिसऱ्याही भागाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा हार्दिक पांड्या आणि रॉकी भाईचा फोटो जबरदस्त व्हायरल होत आहे.

हार्दिकने सोशल मीडियावर शेयर केलेल्या त्या फोटोवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. रॉकी भाईसोबत हटक्या स्टाईलमध्ये हार्दिकनं शेयर केलेला तो फोटो चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडतोय. चाहत्यांनी आता हार्दिकला केजीएफचा व्हिलन होण्याचा आग्रह त्या शेअर केलेल्या पोस्टवर केला आहे.

पांड्याची सोशल मीडियावर पोस्ट पाहिल्यावर त्याच्या चेहेऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसून येत आहे. चाहत्यांचे फोटोवरील प्रेम आणि केजीएफच्या स्टारसोबत काढलेला खास फोटो यामुळे तो कमालीचा आनंदात दिसून येत आहे. त्यानेही चाहत्यांनी केलेल्या कमेंटसवर दिलखुलास उत्तर दिले आहेत. संधी मिळाल्यास...सर्वांना मनपूर्वक धन्यवाद म्हणायला तो विसरलेला नाही.

केजीएफ मधल्या रॉकीचा आणि हार्दिकचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांचाही आनंद गगनात मावेनासा झाला आहे. एकानं चाहत्याने लिहिले की, वा क्या बात है, किती सुंदर फोटो आहे. तर आणखी एक युजर्स म्हणतो, केजीएफ ३ मध्ये व्हिलन हो म्हणजे आणखी डबल धमाका प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

केजीएफ चित्रपटाने यशला भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख करुन दिली आहे. सोबतच त्या चित्रपटामुळे यशच्या चाहत्यांमध्येही बरीच वाढ झाली आहे. यामध्ये केजीएफच्या तिसऱ्या भागाची चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर केजीएफच्या दोन्ही भागांनी कमाल केली होती. दरम्यानच्या काळात यशनं बॉलीवूड आणि टॉलीवूडवरही वादग्रस्त भाषण केले होते.

जानेवारीत यशचा वाढदिवस असून चाहते केजीएफ ३ बद्दल कमालीचे उत्सुक आहेत. वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर केजीएफ ३ ची घोषणा करतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यासर्वात मात्र हार्दिकने सर्वांचेच लक्ष वेधले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT