Ketaki Chitale Social Media Post
Ketaki Chitale Social Media Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ketaki Chitale: ‘लोक मलाही घाबरले होते का?...’; राहुल गांधींच्या प्रकरणानंतर केतकीची पोस्ट चर्चेत

Chetan Bodke

Ketaki Chitale Social Media Post: सध्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) सर्वत्र चर्चेचा विषय ठरले. कारण आहे, मोदी आडनावावरून केलेलं वक्तव्य. राहुल गांधी यांनी मोदी आडनावारून वक्तव्य केल्यामुळे गुरुवारी सुरत न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून शुक्रवारी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यावरून आता देशातील राजकीय नेत्यांसोबतच अनेक मंडळींनीही आपली प्रतिक्रिया दिली. अशातच मनोरंजन क्षेत्रातूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

‘आंबट गोड’ फेम केतकी चितळे (Ketaki Chitale) नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती नेहमीच राजकीय आणि सामाजिक विषयावर आपले मत मांडण्याचा प्रयत्न करते. अशातच तिचं राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर केतकीने आपली प्रतिक्रिया दिली. सध्या तिची प्रतिक्रिया सोशल मीडियावर बरीच व्हायरल होतेय. तिने राहुल गांधींवर मानहानी प्रकरणातील कारवाई व तिच्यावर शरद पवार यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर झालेली कारवाई, या दोन्ही गोष्टींचा संदर्भ जोडत तिने पोस्ट केली.

Ketaki Chitale Social Media

इंस्टाग्रामवर स्टेटस टाकत केतकी म्हणते, “काही लोकांच्या मते ते राहुल गांधींना घाबरल्याने मानहानीचा खटला दाखल केला. या लॉजिकने लोक मलाही घाबरले होते का?”असं ती म्हणते.

केतकी चितळेची ओळख म्हणजे, नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारी अभिनेत्री. यापूर्वी एकदा शरद पवारांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तिची पोलीस स्थानकात देखील रवानगी करण्यात आली होती. नुकतच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून गुढी पाडव्याच्या दिवशी पुण्याच्या माणसांवर टीका केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Metro: मालाड स्थानकाचं नाव बदललं, आता 'मोतीलाल ओसवाल मालाड'च्या नावाने ओळखले जाणार हे मेट्रो स्थानक

IPL 2024 Qualifier 1 SRH vs KKR: अय्यर ऑन फायर; हैदराबादचं वर्चस्व मोडून काढलं, कोलकाता फायनलमध्ये

Maval Lok Sabha: निकालापूर्वीच मावळमध्ये महायुतीत खदखद, बारणे म्हणतात दादा आले पण 'पावर' नाही

Latur Gous Shaikh Motivatinal Story | पायाने पेपर लिहला! हात नसलेल्या या चॅम्पीयनचा पॅटर्नच वेगळा आहे.

Special Report : चिकन फ्राय की गटर फ्राय? संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT