Kesari Chapter 2 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kesari Chapter 2 :'केसरी २'च्या टीमनं दिली सुवर्ण मंदिराला भेट; अक्षय-माधवन अन् अनन्यानं घेतलं दर्शन, पाहा Photo

Kesari Chapter 2 Team Visit Golden Temple : 'केसरी चॅप्टर 2' चित्रपटाच्या टीमने सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार लवकरच 'केसरी चॅप्टर 2' मधून (Kesari Chapter 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता आर माधवन आणि अभिनेत्री अनन्या पांडे देखील पाहायला मिळणार आहेत. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. याच निमित्ताने चित्रपटाच्या टीमने अमृतसर मधील सुवर्ण मंदिराला (Golden Temple ) भेट दिली आहे. ज्याचा फोटो अनन्या पांडेने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अनन्याने ( Ananya Panday) शेअर केलेल्या फोटोमध्ये आर माधवन (R Madhavan) , अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अनन्या पांडे स्वतः असून मागे सुवर्ण मंदिर दिसत आहे. पोस्टला अनन्याने खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह" तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'केसरी चॅप्टर 2' मधून जालियनवाला बाग हत्याकांड या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

सुवर्ण मंदिराला भेट देताना अनन्या पांडेने बेबी पिंक रंगाचा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केला होता. तर अक्षय कुमारने निळ्या रंगाच्या शर्ट आणि माधवनने पांढरा कुर्ता घातला होता. तिघेही हात जोडून उभे असलेले पाहायला मिळत आहे. 'केसरी चॅप्टर 2' चा ट्रेलर पाहून चाहेत चित्रपटासाठी खूपच उत्सुक झाले आहेत. 'केसरी चॅप्टर 2'चित्रपट 18 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'केसरी चॅप्टर 2'मध्ये अक्षय कुमार सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहेत. जे वकिल होते. अनन्या पांडे युवा वकील दिलरीत गिलच्या भूमिकेत दिसणार आहे. 'केसरी चॅप्टर 2' चित्रपटाचे दिग्दर्शन करण सिंग यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Rules: इन्कम टॅक्स भरणारांना मोठा दिलासा! ६०,००० रुपयांच्या टॅक्स रिबेटचा नवा नियम; जाणून घ्या कोणाचा फायदा होणार?

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

SCROLL FOR NEXT