KBC16 SAAM TV
मनोरंजन बातम्या

KBC 16 : कुतुब मिनार संदर्भातील 'या' प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती आहे? केबीसीमध्ये कुणीच देऊ शकलं नाही

Kaun Banega Crorepati : कौन बनेगा करोडपती सीझन 16 च्या एका एपिसोडमध्ये स्पर्धकाला जगातील सर्वात उंच कुतुब मिनार संबंधित प्रश्न केला. याचे योग्य उत्तर स्पर्धकासोबत प्रेक्षकांनाही देता आले नाही. जाणून घेऊयात प्रश्न काय होता.

Shreya Maskar

कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) प्रेक्षक आर्वजून पाहत असतात. नुकत्याच झालेल्या कौन बनेगा करोडपतीच्या एका एपिसोडमध्ये एका प्रश्नाने गोंधळ निर्माण केला. तो प्रश्न कुतुब मिनार संबंधित होता. याचे उत्तर कोणालाच देता नाही आले. हा प्रश्न 6.4 लाख रुपयांसाठी होता.

यंदा कौन बनेगा करोडपती शोवर अंदमान निकोबारच्या शोभिका श्री यांना 'कुतुब मिनार' संबंधित प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता आले नाही. तसेच याचे उत्तर प्रेक्षकांनाही देता नाही आले. शोभिका श्री ही दिल्लीत (Delhi) राहणारी आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात ती काम करते. शोभिका श्रीला (sobhita shri) 6.4 लाख रुपयांसाठी कुतुबमिनार जीर्णोद्धाराशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर तिला देता न आल्यामुळे तिला 3.2 लाख रुपयेच मिळाले.

काय होता प्रश्न?

कुतुब मिनारच्या पृष्ठभागावर लिहिलेल्या शिलालेखांनुसार, कुतुबमिनारची दुरुस्ती खालीलपैकी कोणी केली? असा प्रश्न करण्यात आला. यावर चार ऑप्शन देण्यात आले. पहिला सिकंदर लोदी, दुसरा खिजर खान , तिसरा अकबर आणि चौथा ऑप्शन मोहम्मद बिन तुघलक असे चार ऑप्शन होते. यावर शोभिका श्री यांना उत्तर देता आल नाही. त्या गोंधळात पडल्या. त्यामुळे त्यांनी प्रेक्षकांचा कौल वापरला. पण प्रेक्षकांनाही त्याचे उत्तर देता आले नाही. या प्रश्नाचे उत्तर देता न आल्यामुळे शोभिका श्रीला ६.४ लाख रुपये जिंकता आले नाहीत.

नेमकं उत्तर काय?

कोणालाच याचे उत्तर देता न आल्यामुळे शेवटी याचे उत्तर शो संपल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी स्वतः दिले. कुतुबमिनारच्या (Gutub Minar) पृष्ठभागावर लिहिलेल्या शिलालेखांनुसार, कुतुबमिनारची दुरुस्ती खालीलपैकी कोणी केली? या प्रश्नाचे खरे उत्तर सिकंदर लोधी असे होते. सिकंदर लोदीनेच १६व्या शतकात कुतुबमिनारची दुरुस्ती केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची सावध भूमिका

Winter Hair Care : थंडीमध्ये केस गळणे थांबवण्यासाठी करा हे घरगुती सोपे उपाय

Saturday Rules: शनिवारी केस कापावे की नाही?

Government Job Scam : सरकारी नोकरीचं आमिष, १५ लाख घेतले; बनावट जॉइनिंग लेटरही दिलं, धक्कादायक प्रकार उघड

Prasar Bharti Recruitment: आनंदाची बातमी! दूरदर्शन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT