Amitabh Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: बिग बींना आयुष्यात उंचीच नडली, हॉटसीटवरील स्पर्धकासमोर व्यक्त केली खंत...

नुकत्याच झालेल्या 'कौन बनेगा करोडपती'च्या भागात त्यांनी आपल्या उंचीवरील एक किस्सा शेअर केला आहे.

Chetan Bodke

Amitabh Bachchan: बॉलिवूडमधील अभिनयाचे शहेनशाह अमिताभ बच्चन बऱ्याचदा चर्चेत असतात. बिग बी सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टवर चाहत्यांचे भरभरून कमेंट्स आणि लाईक्स असतात. त्यांनी आपल्या अभिनयाने एकेकाळी अख्खं बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली होती. बिग बी नेहमीच 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकदा त्यांनी आपल्या आयुष्यातील काही रंजक किस्से चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. कधी कधी तर चाहत्यांच्या अट्टाहासापायी ही काही किस्से शेअर केले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्या बालपणातील एक किस्सा नुकताच शेअर केला आहे. नुकत्याच झालेल्या 'कौन बनेगा करोडपती'च्या भागात त्यांच्या उंचीवरील एक किस्सा शेअर केला आहे.

यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉटसीटवर काशवी शर्मा ही स्पर्धक बसली होती. शोमध्ये त्यांनी अनेक आपल्या खासगी आयुष्यातील किस्स्यांवर चर्चा केली. शो ला सुरुवात होताच तिने तिच्या उंचीवरून चर्चा करण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळी तिने सांगितले की, “मला माझ्या उंचीवरूनसुद्धा बराच प्रॉब्लम होता, त्यावर अमिताभ बच्चन यांनीही आपली खंत व्यक्त केली.

त्यांनाही उंचीमुळे आपल्या शालेय जीवनात अनेकदा त्रास सहन करावा लागला होता. सोबतच त्यांनी शालेय जीवनातील काही किस्सेही सांगितले, आमच्या शाळेत बॉक्सिंग हे बंधनकारक होते. माझ्या उंचीमुळे मला मोठ्या वर्गातील मुलांबरोबर खेळायला द्यायचे, शाळेत मला खूप मार खावा लागला होता कारण माझी उंची जास्त होती.”

उंचीमुळे अमिताभ बच्चन यांना शालेय जीवनातच नाही तर बॉलिवूडमध्येही अनेक गोष्टींचा सामना करावा लागला होता. सुरवातीला त्यांच्या उंचीमुळे त्यांना चित्रपटात कोणी ही काम देत नव्हते. कारण त्याकाळात डॅशिंग कलाकारांची क्रेझ होती. मात्र त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर या सगळ्या गोष्टींवर मात करत बॉलिवूडचे शहेनशहा बनले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का, मोठा नेता उपमुख्यमंत्र्यांच्या गटात जाण्याच्या तयारीत

'तू खूप क्यूट आहेस' म्हणाला अन्...; स्कूल बसचालकाचं 9 वर्षांच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य|VIDEO

Chanakya Niti : चाणक्यांच्या या ३ गोष्टी समजून घ्या, संसार कधीच मोडणार नाही

Pune Airport : बँकॉक वरून आलेल्या प्रवासीकडून ६ कोटींचा गांजा जप्त; पुणे विमानतळावर मोठी कारवाई

Maharashtra Live News Update: मीरा रोडच्या केम छो बारवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल

SCROLL FOR NEXT