Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२५, माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन, महाराष्ट्रात पावसाची विश्रांती, संसदेचे पावसाळी अधिवेशन, राज-उद्धव एकत्र येण्यावर चर्चा, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

चारचाकी वाहन घुसली घरात,नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील दत्तरापूर जवळील घटना

नागपूर वरून पुण्याला जात असताना घडला अपघात,होडाईची वरना याच्या चालकांचा वाहनावरील ताबा सुटल्याने दत्तरापूर येथील घराच्या पोर्च मध्ये कार शिरली

या घटनेत वाहनातील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना यवतमाळ इंथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

घरातील सगळे जण रूम मध्ये असल्याने जिवितहानी झाली नाही,हि घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी

नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील दतरामपूर या गावाजवळ अद्यापही रस्त्याचा काम अपूर्णच असल्याने इथे वारंवार अपघात होताहेत

दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग

रात्रभर सुरु असणाऱ्या पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगुळी गावातील ग्रामस्थांच्या घरात शिरले पाणी

मनगुळी गावात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे संपूर्ण गावाला प्राप्त झाले तळ्याचे स्वरूप

मनगुळीच्या ग्रामस्थांना रात्र काढावी लागली पावसात तर,पावसाच्या माऱ्यामुळे मनगुळीच्या ग्रामस्थांच जनजीवन झाले विस्कळीत

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट सकाळपासून पावसाची रीपरीप

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. रात्री पासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असून आज सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काही भागात सकाळी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या तर काही भागात पावसाची रीपरीप सुरू आहे. मागील पाच ते सहा दिवस पावसाने पुर्णता विश्रांती घेतली होती. मात्र आज सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू झाला आहे.

अजित दादा शब्दाचे पक्के. मला मंत्रिपद देऊन न्याय देण्याचा दिला शब्द, आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं मोठं विधान 

अजित दादा हे शब्दाचे पक्के आहेत. दिलेला शब्द अजितदादा पाळतात.माझी सिनॅरिटी काउंट करून मला मंत्रिपद देण्याचा शब्द अजितदादा यांनी दिल्याचे विधान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले आहे.नांदेडच्या कंधार तालुक्यातील चिखली येथे आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रताप पाटील चिखलीकर बोलत होते. 2004 मध्ये मी शिलाई मशीन या निशाणीवर निवडणूक जिंकली.त्यावेळेस मला तुझी पहिली वेळ आहे. तू थांब. शिवसेनेतून निवडून आलो शिवसेनेवाले म्हणाले तुझी पहिली वेळ आहे तू थांब. भाजपमधून निवडून आलो भाजपवाले म्हणाले तुझी पहिली वेळ आहे तू थांब.आता राष्ट्रवादी मधून निवडून आलो. परंतु आता दादाने मला शब्द दिला आहे माझी 2004 पासूनची सिनॅरिटी काउंट करून मला मंत्रिपद देण्याचं आश्वासन अजितदादांनी दिलं असल्याचं विधान राष्ट्रवादीचे कंधार लोहा विधानसभेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केल आहे.

-पुणे-नागपूर-पुणे 'वंदे भारत एक्सप्रेस'ला रेल्वे मंत्र्यांची मंजुरी

पुणे-नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

-येत्या महिनाभरात ही रेल्वे गाडी सुरू करण्याचे नियोजन मध्य रेल्वेच्या बोर्डाकडून करण्यास सुरुवात झाली आहे.

-या रेल्वे गाडीमुळे पुणे-नागपूर प्रवास सुमारे दीड ते दोन तासांनी कमी होणार आहे.

-पुणे -नागपूर-पुणे या रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, ही मागणी दोन वर्षांपासून करण्यात येत होती

विहरीत पडलेल्या तरुणाला पोलिसांनी काढले सुखरुप बाहेर

-नाशिकच्या कळवण पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि धाडसामुळे विहिरीत पडलेल्या सप्तश्रृंग गड येथील रामदास सुर्यवंशी या तरुणाला बाहेर काढण्यात यश आले.कळवण मधिल दादा धुमसे यांच्या विहिरीत पडल्याची माहिती पोलिसांना कळविण्यात येताच पोलिस अधिकारी व कर्मचा-यांनी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने रामदास सुर्यवंशी याला सुखरुप बाहेर काढले,त्याच्या हाता तोंडाला जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चीनी बेदाण्यामुळे दरात घसरण सुरूच; शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान

गौरी गणपती सणाच्या तोंडावर बेदाण्याचे दर प्रती किलो 20 ते 25 रुपयांनी घसरले आहेत. महिना भरानंतरही दराची घसरण सुरूच आहे. दर कमी झाल्याने बेदाणा उत्पादक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान चीन मधून नेपाळमार्गे चोरट्या मार्गाने येणार्या बेदाण्यावर बंदी घालावी, अशी मागणी बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापार्यांनी केली आहे.

यावर्षी सोलापूर,सांगली, सातारा यासह अनेक भागात मोठ्या प्रमाणावर बेदाण्याचे उत्पादन घेण्यात आले आहे. मागील वर्षभरापासून बाजारात बेदाण्याचे दर टिकून होते. बेदाण्याला उच्चांकी 450 ते 550 रुपये प्रती किलो दर मिळाला होता. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतर्यांना चांगले दिवस आले होते.

मालेगाव-मनमाड तापमानात वाढ,तापमान ३३ अंशाच्या पुढे

नाशिक जिल्हयाच्या मनमाड-मालेगावसह काही भागात गेल्या तीन आठवड्या पासून पावसाने हुलकावणी दिल्याने दिवसभर कडक ऊन पडत आहे.सकाळ पासूनच हळू हळू ऊन्हाचा पारा वाढत असल्याने नागरीकांना उन्हाचे चटके बसू लागले आहे.ऐन उन्हाळ्याच्या दिवसात रोज अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.मात्र आता पावसाळ्यात ऊन्हा पारा वाढत असल्याच चित्र पहावयास मिळत आहे.

मनोज जरांगे पाटील असलेली लिफ्ट जमिनीवर आदळल्यानंतर विद्युत विभागाचे शिवाजीराव हॉस्पिटलला लिफ्ट बंद करण्यासंदर्भात पत्र

मनोज जरांगे पाटील असलेली लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट ग्राउंड फ्लोअरला येऊन आदळली होती. ही घटना दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये घडली होती. यामध्ये जरांगे पाटलांच्या एका सहकाऱ्याला किरकोळ इजा झाली होती. मात्र सुदैवाने इतर कोणालाही इजा झाली नाही. यानंतर बीडच्या विद्युत विभागाने डॉक्टर अरुण बडे यांच्या शिवाजीराव हार्ट केअर हॉस्पिटलला पत्र दिले असुन यामध्ये आपल्या हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या लिफ्टला परवानगी नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तर लिफ्ट तात्काळ बंद करावी आणि विद्युत विभागाकडून लिफ्टची परवानगी मिळवावी तसे न केल्यास आणि लिफ्ट चालू ठेवल्यास जीवित किंवा वित्त हानी झाल्यास हॉस्पिटलची जबाबदारी असेल असा उल्लेख करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड मुक्कामी.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज बीड मुक्कामी असून बीडमध्ये ते तीन वाजता दाखल होत आहेत अजित पवार दोन दिवसाच्या बीड मुक्कामी येत असून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे वडवणी मध्ये मुंडे पिता मित्रांचा पक्षप्रवेश त्याचबरोबर शासकीय कामा बाबतचा आढावा ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयात घेणार आहेत. त्याचबरोबर पक्षातील पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेणार आहेत.

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षण लढ्यातील विजया शिवाय फेटा बांधणार नाही - मनोज जरांगे पाटील

धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून फेटा बांधण्याचा आग्रह, मनोज जरांगे पाटील यांच्याकडून फेटा बांधण्यास नकार

29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार सक्रिय सहभाग घेणार

मनोज जरांगे पाटील यांचा धाराशिवमध्ये गाठीभेटी दौरा , मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय सहभाग घेणार असल्याचं आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं

महाविकास आघाडी आरक्षण आंदोलनात सक्रिय सहभागी असेल आमदार प्रवीण स्वामी यांनी सांगितलं

मावळमध्ये तीन ठिकाणी छापे मारून केली 19 लाख रुपयांची गावठी दारू जप्त

पुणे मार्केट यार्ड, सेल पिंपळगाव, आणि आंबी मावळ येथील विविध हातभट्ट्यावर छापे मारत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने 19 लाख 71 हजार 200 रुपयांची माल हस्तगत केली आहे. एकूण पाच गुन्ह्यांमध्ये चार आरोपीसह 3220 लिटर गावठी हातभट्टी दारू असा एकूण 19 लाख 71 हजार दोनशे रुपये किमतीचा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवा राठोड, सोमनाथ थोटे, विष्णू उदावंत, आणि सुशील सूर्यवंशी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन विभागाच्या वतीने तीन तुकड्या करून छापे मारून हा सर्व हातभट्टीचा माल जप्त करण्यात आलेला आहे..

पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक दृष्टीने भाजपचे मोर्चे बांधणे

नवेल महानगरपालिका निवडणूक दृष्टीने भाजपने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली माजी खासदार रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली खिडूकपाडा गावातील ग्रामस्थांनी तसेच शेतकरी कामगार पक्षातील काही नेत्यांनी भाजप मध्ये माथाडी कामगार आणि खिडूकपाडा गावातील नागरिकांनी भाजपमध्ये प्रक्ष प्रवेश केला.यावेळी माजी खासदार राम ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नागराध्यक्ष जे.एम.म्हात्रे., माजी नगरसेवक ग्रामस्थ उपस्थित होते....

नवी मुंबई तळोजा एमआयडीसीत प्रदूषणाचा कहर; गावकऱ्यांचा संताप

तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या रासायनिक कंपन्यांकडून एमपीसीबीच्या नियमांचे उल्लंघन होत असून, शुद्धीकरण न केलेले घातक रसायन थेट नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे भूजलस्रोत व शेती गंभीरपणे दूषित झाली असून, नागरिकांना अतिसार, उलट्या-जुलाब अशा आजारांचा त्रास सहन करावा लागत आहे.

गोटगाव व तळोजा वसाहतीतील नागरिकांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे तक्रार केली आहे. रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या विषारी वायूमुळे खारघर व तळोजा परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत. सीईटीपी बंद असून औद्योगिक कचरा सिडको डम्पिंग यार्डमध्ये प्रक्रिया न करता साठवला जात असल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

वारंवार निवेदने दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने गावकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि पनवेल महापालिकेला दोषी कंपन्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra Live News Update: पुण्यात जुलैत चार वर्षातील सर्वात कमी पाऊस

यंदाच्या जुलैमध्ये पावसाने शहराकडे पाठ फिरवण्याचे स्पष्ट झाले आहे.

जुलैमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला असून

यावर्षीचा पाऊस गेल्या चार वर्षातील नीचांक ठरला आहे.

येत्या काही दिवसात पाऊस अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला आहे.

जुलैमध्ये पुण्यात सरासरी 185 मिलिमीटर पाऊस पडतो

मात्र यंदा 130 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दोन ऑगस्ट पासून पुण्यात पावसाने उघडीत घेतली आहे.

विसर्जन मिरवणुकीसाठी बोलवलेल्या पोलीस आयुक्तांच्या बैठकीत तोडगा नाहीच

मानाच्या पाच मंडळ आणि इतर महत्त्वाच्या पाच मंडळांना प्रशासनाकडून वेगळा न्याय दिला जातो

इतर गणेश मंडळाच्या बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावना

मानाच्या गणपती नंतर विसर्जन मिरवणूक सुरू करण्यासाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि अखिल मंडळी गणेश मंडळ ठाम.

दगडूशेठ गणपती मंडळ आणि आमच्यात कुठलाही वाद नाही मानाच्या गणपतीची मिरवणूक दोन वाजता पुढे जाते दगडूशेठ चार वाजता येतो त्यामुळे आम्ही मधल्या काळात मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची भूमिका

पोलीस आयुक्त कडून मानाच्या पाच आणि इतर महत्त्वाच्या पाच गणेश मंडळांना सूचना

तुम्ही महत्त्वाची शहरातील गणेश मंडळ असल्याने इतर गणेश मंडळाच्या समस्या जाणून घेऊन समन्वयाने तोडगा काढा

Maharashtra Live News Update: अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात शहर कार्यालय मिळाले

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला हक्काचे कार्यालय मिळाले आहे.

वाकडेवाडी येथे पक्षाचे शहर कार्यालयाचे साठी जागा निश्चित केली आहे

अजित पवार यांच्या हस्ते १५ ऑगस्टला कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com