Amitabh Bachchan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Amitabh Bachchan: 'बायकोला दररोज खोटे बोलावे लागतं'; अमिताभ बच्चनचा KBC वर मजेशीर खुलासा, पाहा व्हिडिओ

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या ब्लॉकबस्टर शो "कौन बनेगा करोडपती १३" मुळे चर्चेत आहेत. स्वतः अमिताभ यांच्यामुळे या शोचा प्रत्येक भाग खास बनतो.

Shruti Vilas Kadam

Amitabh Bachchan: बॉलीवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या ब्लॉकबस्टर शो "कौन बनेगा करोडपती १३" मुळे चर्चेत आहेत. या शोचा प्रत्येक भाग स्वतः अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीमुळे आणखी खास बनतो. केबीसीच्या सीझन १३ ला देखील प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. याने आधीच अनेक स्पर्धकांना श्रीमंत बनवले आहे. अलीकडेच, शोमध्ये दोन अतिशय खास पाहुणे आले आहेत, त्यांच्या येण्याने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन झाले आहे.

'हे' दोन स्टार शोमध्ये आले आहेत

"कौन बनेगा करोडपती १३" चा प्रोमोमध्ये दोन प्रमुख कलाकार, नीना गुप्ता आणि गजराज राव हे पाहुणे म्हणून आले होते. नीना आणि गजराज यांच्या उपस्थितीने हा एपिसोड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. बिग बीने दोन्ही स्पर्धकांना अनेक प्रश्न विचारले, यावेळी नीना गुप्तानेही संधीचा पुरेपूर फायदा घेतला. नीनाने बिग बींनाही काही प्रश्न विचारले, परंतु एका प्रश्नाचे उत्तर देऊन बिग बींनी सर्वांना आश्चर्यचकित केले. या प्रोमोचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नीना बिग बींना अनेक प्रश्न विचारते

केबीसी १३ च्या प्रोमो व्हिडिओमध्ये, नीना गुप्ता अमिताभ बच्चन यांना अनेक प्रश्न विचारते. "मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन," बिग बी उत्तर देतात, "हो, का नाही? मग नीना त्यांना विचारतात, "त्याच्या आयुष्यातील सर्वात आव्हानात्मक भूमिका कोणती?" अमिताभ उत्तर देतात, "पाहा, प्रत्येक चित्रपट माझ्यासाठी एक आव्हान आहे." नीना पुढे म्हणते, "जर तुम्हाला एखादा चित्रपट नाकारायचा असेल, तर तुम्ही कोणते निमित्त सांगता?" अमिताभ बच्चन उत्तर देतात, "त्यासाठी आधी चित्रपट तर मिळू दे ."

मला तर दररोज खोटे बोलाव...

नीना गुप्ता पुढे विचारते, "काही टाळण्यासाठी तुम्ही कधी तुमच्या जोडीदाराशी खोटे बोललात का?" उत्तर देण्याऐवजी, अमिताभ बच्चन गजराज रावला म्हणतात, "तुम्ही आधी उत्तर द्या." हे ऐकून गजराज हसायला लागतो. यानंतर, बिग बी नीनाच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले, "मला तर दररोज खोटे बोलाव लागतं." नीना गुप्ता आणि गजराज राव या उत्तरावर खळखळून हसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील उच्चशिक्षित जोडपं लव्ह मॅरेजनंतर २४ तासांच्या आत झालं वेगळं; कारण फक्त एवढंच

Shocking : "मराठी सोडून हिंदीत बोलते..." ६ वर्षांच्या लेकीची निर्घृण हत्या; निर्दयी आईनेच रचला कट

Maharashtra Live News Update: गुंड बंडू आंदेकर निवडणुकीचा अर्ज भरण्यास दाखल!

Skin Care : 'या' गोष्टी वापरुन करा फेस स्क्रब, सगळे ब्लॅकहेड्स निघून जातील

Palak Pakoda Recipe: काहीतरी चटपटीत खायचंय? ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत पालक पकोडा

SCROLL FOR NEXT