Amitabh Bachchan KBC 16 Instagram
मनोरंजन बातम्या

KBC 16: केबीसीमध्ये झाली गडबड; अमिताभ बच्चन यांनी मागितली महिलेची माफी, वाचा सविस्तर

KBC 16 Amitabh Bachchan : कौन बनेगा करोडपती १६ च्या मागील भागात अमिताभ बच्चन यांनी एक चूक केली त्यामुळे त्यांनी नेशनल टेलीव्हिजन एका महिलेची माफी मागितली.

Shruti Vilas Kadam

KBC 16: सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'कौन बनेगा करोडपती १६' बद्दल सध्या जोरदार चर्चा आहे. हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे जो संपूर्ण कुटुंबासह पहिला जातो. परंतु, कालच्या भागात, सूत्रसंचालन करताना अमिताभ बच्चन यांच्याकडून एक चूक झाली त्यामुळे त्यांना जाहीरपणे एका महिलेची माफी मागावी लागली. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे काय झाले की बिग बींना एका महिलेची माफी मागावी लागली? त्याबद्दल सविस्तर जाऊन घेऊयात

कौन बनेगा करोडपती १६च्या कालच्या भागात, फास्टर फिंगर फर्स्ट राउंड दरम्यान, एक महिला अमिताभ बच्चनकडे सतत पाहत होती. त्यावर अमिताभ बच्चन त्या महिलेला म्हणाले, देवीजी, आम्हाला असे पाहून काहीही होणार नाही, हॉट सीटवर येण्यासाठी तुम्हाला तुमचे बोट लवकर चालवली लागतील. हे वाक्य ऐकून त्या महिलेला थोडी लाज वाटली आणि ती हो सर असं म्हणाली.

पहिल्या फेरीत फास्टर फिंगर चुकला

अमिताभ बच्चन यांनी फास्टर फिंगर फर्स्टसाठी प्रश्न विचारताच, समोर बसलेल्या सर्व लोकांनी उत्तर निवडली. यानंतर, जेव्हा अमिताभ यांनी फास्टर फिंगर फर्स्टच्या विजेत्याचे नाव जाहीर केले तेव्हा त्यांनी रेणुका पांडे यांचे नाव घेतले. रेणुका आनंदाने उड्या मारत स्टेजवर पाऊल ठेवताच अमिताभ बच्चन यांना धक्का बसला आणि ते म्हणाले, "थांबा, देवीजी." संगणकाने आधी तुमचे नाव सांगितले आणि आता तो पार्थचे नाव सांगत आहे.

माफी मागितली

अमिताभ बच्चन यांच्या या विधानामुळे रेणुकाचा आनंद क्षणात संपला. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी त्यांची चूक मान्य केली आणि म्हणाले, "देवीजी, मी चूक केली, कृपया तिथेच बसा आणि माझ्या चुकीसाठी मला माफ करा." त्यानंतर त्यांनी पार्थ चॅटर्जी यांचे नाव घेतले आणि त्यांना हॉट सीटवर बसण्यासाठी आमंत्रित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrapur Farmer: शेतीच्या फेरफारासाठी 2 वर्षे टाळाटाळ; तहसील कार्यालयातच शेतकऱ्यानं घेतला टोकाचा निर्णय

Crime News: नवऱ्याला चारित्र्याचा संशय; वाट अडवून भररस्त्यात बायकोसोबत केलं भयानक कृत्य

Nilesh Ghaywal illegal property : घायवळच्या घरावर पोलिसांची धाड, कोण आहे घायवळचा आका? VIDEO

'आनंदाचा शिधा' बंद होणार? लाडकी बहिण योजनेचा फटका

Two Group Clash : भाजप मंत्र्यांच्या कार्यक्रमादरम्यान मोठा राडा; कार्यकर्ते आपापसात भिडले, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT