Emiway Bantai Wedding: एमीवे बंटाई चढला बोहल्यावर; पहा कोणासोबत केलं लग्न!

Emiway Bantai Wedding: प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाई यांनी लग्न केले आहे. एमीवेने त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट करुन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
Emiway Bantai Wedding
Emiway Bantai WeddingInstagram
Published On

Emiway Bantai Wedding: बॉलीवूडमधून आणखी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. गायक दर्शन रावल यांच्यानंतर आता प्रसिद्ध रॅपर एमीवे बंटाई यांनेही लग्न केले आहे. रॅपरने स्वतः चाहत्यांना त्याच्या लग्नाची बातमी दिली आहे. त्याच्या लग्नाचे काही फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. एमीवे बंटाईने अचानक लग्न केलेले पाहून चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. त्याच वेळी, त्याच्या काही फिमेल चाहत्यांना वाईटही वाटलं आहे.

रॅपर एमीवे बंटाईच्या लग्नाचे फोटो व्हायरल

रॅपर एमीवे बंटाई याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये तो फुलांनी डिझाइन केलेल्या शेरवानीमध्ये दिसत आहे. सनग्लासेस घालून, रॅपरने त्याच्या नववधू स्वालिनासोबत आनंद साजरा करताना दिसत आहे. स्वलिनाने देखील फ्लोरल गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. लाईट मेकअप, पारंपारिक दागिने आणि सनग्लासेससह, स्वालिना खूपच सुंदर दिसत आहे. दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.

Emiway Bantai Wedding
Chhaava: 'छावा'च्या ट्रेलरवरून पुणेकर नाराज; मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा!

रॅपर एमीवे बंटाईची बायको स्वालीना कोण आहे?

स्वलिना एक अभिनेत्री, मॉडेल आणि लोकप्रिय संगीत कलाकार आहे. तिचे खरे नाव हॅलिना कुचे आहे आणि तिचा जन्म १ जुलै १९९५ रोजी फिनलंडमध्ये झाला. स्वलिनाने अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत. दोघांनी २०२३ मध्ये आलेल्या 'कुडी' या सुपरहिट गाण्यात एकत्र काम केले आहे. त्या व्हिडिओमध्ये, चाहत्यांना रॅपर एमीवे बंटाई आणि स्वालिना यांच्यातील केमिस्ट्री खूप आवडली. आता, दोघांनीही लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले आहे.

Emiway Bantai Wedding
Sa La Te Sa La Na Te Movie: पत्रकार आणि पर्यावरणप्रेमींच्या नात्याची गोष्ट; 'स ला ते स ला ना ते' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

या कपलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते रॅपर एमीवेचे त्याच्या अभिनंदन करत आहेत. फोटोंमध्ये, नवविवाहित जोडपे आनंदाने नाचताना दिसत आहे. यापेक्षा आनंदी लग्नाचे फोटो तुम्हाला कदाचित कधीच दिसणार नाहीत, मेड फॉर इच अदर अशा कमेंट करून चाहते या कपलवर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com