Kaun Banega Crorepati 16 canva
मनोरंजन बातम्या

KBC 16: बिग बी यांनी केली महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची स्तुत; KBC च्या मंचावर दिला आठवणींना उजाळा

KBC 16 New Episode: बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' हा रिअ‍ॅलिटी शो सध्या चर्चेत आहे. या शोचा नवीन प्रोमो प्रदर्शित झालाय. प्रोमोमध्या अमिताभ बच्चन यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Saam Tv

बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी होस्ट केलेला सुप्रसिद्ध रिअ‍ॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' सुरु झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये त्यांची भरपूर प्रमाणात चर्चा सुरु आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जबरजदस्त सूत्रसंचालनामुळे चाहत्यांनी त्यांचं भरभरु कौतुक केले आह. अमिताभ बच्चन यांच्या अद्भुत गेम प्ले आणि हॉटसीटवर बसणाऱ्या स्पर्धकांच्या प्रेरणादायक गोष्टींमुळे प्रेक्षकांना प्रत्येक भागाबद्दल उत्सुकता निर्माण होते. 'कौन बनेगा करोडपती' चा हा १६वा सिझन आहे. अमिताभ बच्चन यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीमुळे अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्तराबद्दल उत्सुकता वाढते.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट गाजवले आहेत. त्यांच्या अनेक चित्रपटांनी चित्रपटगृहांमध्ये शिट्यांचा आणि टाळ्यांचा कडकडाट होण्यास भाग पाडला आहे. सध्या अमिाभ 'कौन बनेगा करोडपती १६' शोमुळे चर्चोत आहेत.

'कौन बनेगा करोडपती १६' चा नवीन प्रोमो सोनी एंटर्टेंमेंट्स यांच्या कडून प्रदर्शित करण्यात आला आहे. शोच्या आगामी एपिसोडमध्ये बीडमधले किशोर अहेर हॉटसीटवर दिसणार आहे. किशोर अहेर सध्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत आहेत. किशोर बीडमधील एका लायब्ररीमध्ये लायब्ररीयन म्हणून काम करतात. किशोर यांना त्यांच्या आजोबांच्या स्मरणात त्यांच्या गावामध्ये एक शैक्षणिक संस्था उभी करण्याचे स्वप्न आहे. त्याचं हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर आला आहे. प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन किशोरला त्यांच्या खाण्यापिण्याच्या अवडींविषयी विचारत आहेत. खाड्यपदार्थांविषयी गप्पा मारताना बिग बींच्या लहानपनीच्या आठवणी त्यांच्या डोळ्यामध्ये दिसल्या.

किशोरची गोष्ट एकुन अमिताभ बच्चन यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांमधला संघर्श आठवला. त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नसायचे. त्याकाळामध्ये अमिताभ बच्चन मुंबईतील एका छोट्याशा महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला जायचे. त्या रेस्टॉरंटमध्ये अमिताभ यांना माफक दरात रुचकर जेवण मिळायचे. या जुन्या आठवणी सांगताना अमिताभ यांनी मराठमोळ्या जेवणाची आणि पदार्थांची स्तुती केली.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Insurance: आता २४ तास अ‍ॅडमिड होण्याची गरज नाही; केवळ २ तास रूग्णालयात राहूनही मिळणार क्लेम

Maharashtra Politics : तुमचा मालक बाटगा, गळ्यात काँग्रेसचं मंगळसूत्र अन् टिळा शरद पवारांचा; रामदास कदमांचा ठाकरेंवर तिखट वार

Pune : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडलं झुरळ, कॅम्प परिसरातील हॉटेलमधील किळसवाणा प्रकार समोर

Maharashtra Live News Update : सामच्या बातमीनंतर धडगाव नगरपंचायत प्रशासनाला आली जाग

Parbhani : शेती मशागत करताना दुर्दैवी घटना; कोळपणी करताना विद्युत तारेला स्पर्श, शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT