Manasvi Choudhary
चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन वर्षातून दोन वेळा वाढदिवस साजरा करतात.
११ ऑक्टोबर आणि २ ऑगस्टला अमिताभ बच्चन आपला वाढदिवस साजरा करतात.
११ ऑक्टोबर १९४२ रोजी अमिताभ बच्चन यांचा जन्मदिवस झाला.
अमिताभ बच्चन २ ऑगस्टला त्यांचा दुसरा वाढदिवस साजरा करतात. याचे कारणही खास आहे.
१९८२ मध्ये अमिताभ बच्चन यांचा कुली चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अपघात झाला.
या अपघातात अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
दोन महिने अमिताभ बच्चन यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती प्रचंड गंभीर असल्याने डॉक्टरांनीही आशा सोडली होती.
चित्रपटसृष्टीसह संपूर्ण देशभरातील चाहते अमिताभ बच्चन यांच्यासाठी प्रार्थना करत होते.
२ ऑगस्ट रोजी मृत्यूंशी झुंज दिल्याने बीग बी यांचा दुसऱ्यांदा त्यांचा जन्म झाला असे मानतात.