Vicky- Katrina At Sam Bahadur Special Screening Instagram
मनोरंजन बातम्या

Sam Bahadur Special Screening: ‘सॅम बहादूर’च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान मॉडर्न कतरिना झाली 'संस्कारी बहू', एका कृत्यानं जिंकली नेटकऱ्यांची मने

Vicky- Katrina At Sam Bahadur Special Screening: विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रिनिंगला कतरिना कैफसोबत, विकी कौशलच्या आई वडीलांनीही हजेरी लावली होती. यावेळी विकी- कतरिनाच्या साध्या पणाने नेटकऱ्यांचे मन जिंकले.

Chetan Bodke

Katrina Kaif With Laws

विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेला ‘सॅम बहादुर’ येत्या १ डिसेंबरला अर्थात उद्या देशासह जगभरामध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून काल निर्मात्यांकडून चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कतरिना कैफसोबत, विकी कौशलच्या आई वडीलांनीही हजेरी लावली होती. (Bollywood)

चित्रपटातील कलाकारांच्या फॅमिलीसाठी, सोबतच बॉलिवूड सेलिब्रिटींसाठीही स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केले होते. यावेळी कतरिना कैफने ब्लॅक कलरच्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये तर विकी सुद्धा ब्लॅक कलरच्या शर्ट, पँट आणि कोटमध्ये स्पॉट झाला होता. ‘सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी विकीच्या आई- वडिलांनी सुद्धा हजेरी लावली होती. यावेळी कतरिनाच्या कृत्याने सर्वांचेच लक्ष वेधले. (Bollywood News)

इन्स्टंट बॉलिवूड या पापाराझी इन्स्टाग्राम चॅनलने कतरिनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कतरिना मीडियाच्या गर्दीमध्ये आपल्या सासु- सासऱ्यांना कशा प्रकारे सांभाळते, हे दिसले. यावेळी नेटकऱ्यांनी कतरिनाला ‘केअरिंग बहु’ म्हणून तिचे कौतुक केले आहे. तर काहींनी कौशल फॅमिलीला ‘सॅम बहादुर फॅमिली’ म्हणून बोलले आहे. सोबतच कतरिनाच्या साधेपणाचेही नेटकरी तुफान कौतुक करत आहेत. (Social Media)

‘सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रिनिंगला विक्की कौशलच्या आई वडीलांनीही उपस्थित लावली होती. यावेळी विकी कौशलचे वडील शाम कौशल, आई वीणा कौशल येताच विकी त्यांच्या पाया पडला. तर भाऊ सनी कौशलला मिठी मारली. विकी कौशलच्या या कृत्याने चाहत्यांचे मने जिंकली. यावेळी ‘सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रिनिंगला, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, करण जोहर, अभिषेक बच्चनसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT