Isabelle Kaif SAAM TV
मनोरंजन बातम्या

Isabelle Kaif : कतरिनाची बहीण घेऊन येतेय अनोखी प्रेमकथा, धमाकेदार टीझर पाहिलात?

Katrina Kaif Sister Isabelle Bollywood Debut : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इसाबेल आता लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिच्या चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज झाला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडची सुपरस्टार कतरिना कैफची (Katrina Kaif ) बहिण लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. कतरिना कैफची बहीण इसाबेलचा (Isabelle Kaif) नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर नुकताच रिलीज झाला आहे. इसाबेल आपल्या पहिल्या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता पुलकित सम्राटसोबत (Pulkit Samrat) स्क्रीन शेअर करणार आहे. इसाबेलला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

इसाबेल ही 'सुस्वागतम खुशामदीद' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात इसाबेल ही आग्र्यातील नूर नावाच्या मुलीची भूमिका तर पुलकित दिल्लीमधील अमन नावाच्या मुलाची भूमिका साकारणार आहेत. चित्रपटात एक प्रेम कथा दाखवण्यात येणार आहे. टिझरमध्ये इसाबेल आणि पुलकितचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. दोघांची केमिस्ट्री पाहून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

'सुस्वागतम खुशामदीद' चित्रपटाच्या टिझरला हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं की, "दोन जीव, दोन संस्कृती, एक प्रेमकथा" सध्या या टिझरवर प्रेक्षकांकडून प्रेमाचा आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'सुस्वागतम खुशामदीद' चित्रपट 16 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात दोन वेगळ्या संस्कृती दाखवण्यात आल्या आहेत. ही प्रेम कथा अशी उलघडणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

कतरिनाने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. आता इसाबेलही आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर कशी करणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'सुस्वागतम खुशामदीद' चित्रपटात पुलकित सम्राट आणि इसाबेल कैफसोबतच साहिल वैद, प्रियांका सिंग, ऋतुराज सिंग, अरुण बाली, नीला मुल्हेरकर, मनु ऋषी चड्ढा, राजकुमार कनौजिया, श्रुती उल्फाद आणि सऊरोज हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT