बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ तिच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच कतरिनाने आपला वाढदिवस साजरा केला, ती 41 वर्षांची झाली आहे. मात्र, तिच्या फिटनेसकडे पाहून क्वचितच तिच्या वयाचा अंदाज येईल. कॅटरीना कैफची त्वचा इतकी ग्लोइंग आणि सुंदर आहे की, कधीकधी तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण होते. त्यामुळे तरुण मुलींची ती नक्कीच 'ब्युटी आयडॉल' आहे. जर तुम्हालाही कॅटसारखी त्वचा राखायची असेल आणि तिच्यासारखी चमक आणायची असेल, तर तिचे सौंदर्य रहस्य काय आहे हे जाणून घ्या.
कतरिना कैफ बी-टाऊनमधील सर्वात फिट अभिनेत्री आहे. त्यामुळे तिच्या दिवसाची सुरुवात वर्कआऊटने होते. वर्कआऊट, जीम या रुटीनविषयी ती शिस्तबद्ध आहे. विविध मुलाखतींमधून तिच्यासोबत काम करणाऱ्या अनेक सकलाकारांनी तिच्या या फिटनेसविषयी प्रशंसा केली आहे. कोणत्याही कारणाने ती वर्कआऊटपासून दूर राहत नाही.
नुकताच ब्रुटला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या फिटनेसविषयी भाष्य केले आहे. यामध्ये दिवसभरात ती काय खाते, तिचा दिवस कसा असतो यावर बोलली आहे. या मुलाखतीमध्ये तिने एका विशेष फळाचा उल्लेख केला आहे. पर्सिमॉन हे फळ खात असल्याचं कतरिनाने म्हटले आहे. सकाळच्या वेळेत दोन वेळा नाश्ता करत असल्याचंसुद्धा तिने सांगितले आहे. यामध्ये प्रामुख्याने अॅव्हाकॅडो टोस्टचाही तिने उल्लेख केला. अॅव्हाकॅडो हे एक फळ आहे. व्यायाम करणाऱे आणि डाएट करणारे अनेकजण हे फळ आवर्जुन खातात.
त्यामुळे ती लोकांना चांगला आहार आणि व्यायाम करून निरोगी राहण्यासाठी प्रेरित करते. 2010 मध्ये, जेव्हा तिचं शीला की जवानी रिलीज हे गाणं रिलिज झाले होते. त्यावेळी कतरिनाचे विशेष कौतुक झाले. कारण, त्यामध्ये तिने फिटनेसच्या माध्यमातून सिक्स-पॅक ऍब्स तयार केले. फिटनेसच्या बाबतीत हा अजूनही बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. ती तिच्या फिटनेसला खूप गांभीर्याने घेते.
कतरिनाने 2003 मध्ये ‘बूम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच तिचे मेरी ख्रिसमस आणि टायगर-3 हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.