Navratri Diet Plan : नवरात्रीच्या उपवासात या पदार्थांचा करा आहारात समावेश, वजन कमी करण्यासोबतच मिळतील शरीराला अनेक फायदे

Navratri Diet: नवरात्रीचा उपवास करुन तुम्ही तुमचे वजनदेखील कमी करु शकतात.
Navratri Diet
Navratri DietSaam Tv
Published On

Navratri Diet Plan:

लवकरच नवरात्री सुरू होणार आहे. नवरात्री म्हटलं की रंग, खाण्यापिण्याचे वेगवेगळे पदार्थ आणि नऊ दिवस वेगवेगळे ड्रेस हे आलेच. नवरात्रीत लोक मोठ्या भक्तीभावाने देवीची पूजा करतात. उपवास करतात. अनेक लोक तर ९ दिवस पायात चप्पलदेखील घालत नाही. नवरात्रीचा उपवास धरुन तुम्ही तुमचे वजनदेखील कमी करु शकतात.

अनेकांना वजन कमी करायचे असते. त्यासाठी डाएट प्लान करतात. परंतु वजन सहजरित्या कमी करण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे उपवास. नवरात्रीच्या दिवसात हलका आहार घेत तुम्ही वजन कमी करु शकतात. यासोबत नवरात्रीत गरबा खेळण्याची पद्धत आहे. गरबा खेळल्याने शरीराचा व्यायम होतो. सलग काही वेळ गरबा खेळल्याने तुम्हाला घाम येतो. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. उपवासात तुम्ही या पदार्थांचा समावेश करा.

Navratri Diet
Navratri 2023 Special Recipe : साबुदाणा न भिजवता 10 मिनिटांत बनवा उपवासाचे कुरकुरीत थालीपीठ, नवरात्री स्पेशल रेसिपी पाहा

नारळ पाणी

नारळ पाणी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नारळ पाणी पिल्याने रोगप्रतिकारकशक्ती वाढते. नारळ पाण्यात कार्बोडायड्रेट्स, कोलेस्ट्रॉल, फायबर, विटामिन सी, विटामिन ए, विटामिन ई आणि विटामिन केचा समावेश असतो. त्यामुळे शरीर सृदृढ राहते. उपवासात दिवसातून एक दोन वेळेस नारळ पाणी प्यावे.

ड्रायफुट्स

ड्रायफ्रुट्सचा वापर तुम्ही उपावासात करु शकता. ड्रायफुट्स खाल्ल्याने तुमच्या शरीराला शरीराला खूप फायदा होतो. ड्रायफुट्रसमध्ये मोठ्या प्रमाणाच पोषक तत्वे असतात.

Navratri Diet
Weight Loss: वाढत्या वजनाने त्रस्त आहात? सकाळच्या नाश्त्यात कडधान्यांचा समावेश करा

पपई

उपवास करताना अनेकदा अॅसिडीटीचा त्रास होतो. काही वेळा पोट साफ होत नाही. अशा काळात पपईचा समावेश आहारात करावा. पपईत विटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुमचे पोट स्वच्छ राहील. पपईसोबतच तुम्ही आहारात अनेक फळांचा समावेश करु शकतात.

दूध

दूधात प्रथिने,कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. दूधातून अनेक पोषक तत्वे आरोग्यास मिळतात. तसेच दूध प्यायल्यानंतर भूक लागत नाही.

Navratri Diet
Shardiya Navratri 2023: साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धशक्ती पीठ महाराष्ट्रात, मुंबई-पुण्याहून फक्त ६ तासांच्या अंतरावर, कसे जाल?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com