Katrina Kaif Pens Heartfelt Note : कतरिनाने 'या' व्यक्तीसाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट; प्रियांका चोप्रानेही केलं कौतुक

Katrina Kaif Shared A Special Post : कतरिनानाच्या एका पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. ही पोस्ट कतरिनाने तिचा असिस्टंट अशोक शर्मासाठी केली आहे.
Katrina Kaif Shared Post For Her Assistant
Katrina Kaif Shared Post For Her AssistantSaam TV
Published On

Katrina Kaif Shared Post For Her Assistant : कतरिना कैफ-विकी कौशल हे बॉलिवूडमधील क्यूट कपल आहे. विकी-कतरिना नेहमीच सोशल मीडियावरुन एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. आता कतरिनानाच्या एका पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं आहे. ही पोस्ट कतरिनाने नवरा विकी कौशलसोबत नाही तर तिचा असिस्टंट अशोक शर्मासाठी केली आहे.

कतरिना नेहमीच सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत असते.काही दिवसांपूर्वीच कतरिनाने नवरा विकी कौशलसोबत मॉर्निंग कॉफीचा फोटो शेअर केला होता. त्यांच्या या फोटोने चाहत्यांना मात्र फार आनंद झाला होता. पण आता कतरिनाने सोशल मीडियावरुन असिस्टंट अशोक शर्माचे कौतुक केले आहे.(Latest Entertainment News In Marathi)

Katrina Kaif Shared Post For Her Assistant
Tamannaah Bhatia Dance With Fan : तमन्ना भाटियाचा विमानतळावरच 'कावाला' डान्स, व्हायरल व्हिडिओ बघून म्हणाल 'शॉक लगा लगा'...

कतरिना आणि तिचे असिस्टंट अशोक शर्मांना एकत्र काम करुन २० वर्ष झाले. त्यानिमित्त कतरिनाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.कतरिनाने अशोक शर्मा सोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो व्हॅनिटीमध्ये काढल्याचं दिसत आहे.

'आज वीस वर्ष पूर्ण झाली...अशोक शर्मा.

गेल्या 20 वर्षात या व्यक्तीने माझ्यासोबत सर्वाधिक वेळ घालवला आहे. हसण्यापासून ते मला आधार देण्यापर्यंत ते मी जे पिण्यासाठी मागितले ते माझ्यासाठी वाईट आहे यासाठी माझ्याशी भांडण्यापर्यंत. मला काय हवंय हे ओळखेपर्यंत. जर मला सेटवर काही त्रास झाला तर माझे अश्रू पुसेपर्यंत. तो नेहमी सोबत असतो.

आम्ही या सर्व गोष्टींमधून गेलो आहोत, त्याचा रोजचा हसरा चेहरा, मला काय हवे आहे हे माझ्या आधी त्याला कळतं.नेहमी माझ्यावर लक्ष ठेवून असतो. पुढील २० वर्षेही असेच एकत्र काम करु'. असं कॅप्शन दिले आहे.

कतरिनाच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कलाकार नेहमीच त्यांच्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल बोलत असतात,त्यांच कौतुक करत असतात.त्यात कतरिनाने केलेल्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिंटींनी कमेंट्स केल्या आहेत. कतरिनाच्या या पोस्टवर प्रियांका चोप्रानेही कमेंट केली आहे. प्रियांकाने कमेंटमध्ये 'बेस्ट' असं लिहलं आहे.तर निम्रत कौरने 'लव्ह इट' असे लिहलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com